शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम शहरात गुटख्याचा काळाबाजार तेजीत

By admin | Updated: July 30, 2014 00:35 IST

छुप्या मार्गाने गुटखा विक्री जोमात: २ रूपयाच्या पुडीची ५ रूपयात विक्री

वाशिम : महाराष्ट्रात गुटखा बंदी लागू झाल्यानंतरही सर्रास गुटखा पुडया विकल्या जात असून गत आठवडयाभरापासून अन्न व औषध प्रशासनाने गुटखा विक्रेत्यांवर करडी नजर ठेवल्याने गुटखा विक्री करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. मात्र शहरातील गुटख्याचा काळाबाजार अद्यापही थांबलेला नाही. शहरातील बहुतांश पान सेंटरवर चढय़ा भावाने गुटख्याची विक्री सुरू आहे. अकोल्याच्या अन्न व औषध प्रशासनाने अकोला व वाशिम जिल्ह्यात गत दोन वर्षात एकूण ७४ कारवायांमधून ६२ लाखाचा गुटखा जप्त करूनही गुटखा विक्री बंद न होता मोठया प्रमाणात सुरूच आहे. आजही कोणत्याही पानठेल्यावर गुटखा पुडया विक्रीस मिळत आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांचा दौरा असल्यास सर्वप्रथम माहिती व्यावसायिकांना मिळते व शहरात चिल्लर होणारी गुटख्याची विक्री काही वेळपर्यंंत बंद राहते. राज्य शासनाने २0 जुलै २0१२ रोजी राज्यात गुटखा बंदी केली आहे. गुटखाबंदीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनावर सोपविली आहे. वाशिम जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाचे स्वतंत्र कार्यालय नसल्याने अकोला येथूनच वाशिमच्या कारभाराचा गाडा हाकला जात आहे. याचा पुरेपुर फायदा गुटखा किंग घेताना दिसून येत आहेत. गत आठवडयापासून मात्र शहरात गुटखा पुडयांचा तुटवडा असल्याने विक्रेत्यांनी २ रूपयाची पुडी ५ रूपयामध्ये केली असली तरी शौकीन मात्र ते सेवन करीत असल्याचे दिसून येत आहे.