शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

गणेश मंडळांचा सन्मान की अवमान?

By admin | Updated: December 16, 2015 01:50 IST

जुन्या सन्मानचिन्हावरून पेटले रण: काहींनी केले सन्मानचिन्ह परत.

धनंजय कपाले / वाशिम: शहरातील प्रत्येक गणेश मंडळातील सदस्यांना सामाजिक उपक्रमाच्या प्रवावाहामध्ये आणण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातील गणेश मंडळांना सन्मानित करण्यात आले; परंतु पुरस्कार वाटपाच्या कार्यक्रमात चक्क २0१२ चे सन्मानचिन्ह वाटण्यात आल्याने गणेश मंडळांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे काही गणेश मंडळांनी सन्मानचिन्ह परत केले.पोलीस प्रशासनाच्या वतीने सन २0१५ मध्ये स्थापन केलेल्या गणेश मंडळाला सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले होते. सामाजिक कार्यक्रमामध्ये उल्लेखनीय कार्य करणार्‍या गणेश मंडळाला सन्मानचिन्ह व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा पोलीस प्रशासनाने गणेश उत्सवाच्या पूर्वीच केली होती. या अनुषंगाने वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या वतीने १४ डिसेंबरला शहरातील गणेश मंडळाला निमंत्रित केले होते. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून वसंतराव धाडवे यांनाही निमंत्रित केले होते; परंतु धाडवे यांनी मंगरूळपीर व शेलूबाजार येथील गणेश मंडळांना निमंत्रित केले. धाडवे यांच्या या प्रकारामुळे पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटला. सामाजिक उपक्रमामध्ये अग्रेसर ठरलेल्या गणेश मंडळापैकी छावा गणेश मंडळाला द्वितीय पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी त्यांना सन २0१२ चे सन्मानचिन्ह (कार्यक्रमाला उपस्थित नसलेल्या ह्यनामदार वर्षाताई गायकवाडह्ण यांच्या हस्ते असे लिहिलेले) देऊन गौरविण्यात आले. जुने सन्मानचिन्ह दिल्यामुळे छावा संघटनेच्या यामध्ये भावना दुखावल्या गेल्या. याशिवाय, मंत्री पार्क गणेश उत्सव मंडळाला सामाजिक उपक्रमामध्ये प्रथम पारितोषिक मिळालेले असताना त्यांना चक्क तृतीय पारितोषिक लिहिलेले स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.