शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींच्या ‘लेटरबॉम्बमुळे’ राजकीय वर्तुळात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:47 IST

नंदकिशाेर नारे वाशिम : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाशिम जिल्ह्यातील शिवसेनेचे लाेकप्रतिनिधी आणि ...

नंदकिशाेर नारे

वाशिम : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाशिम जिल्ह्यातील शिवसेनेचे लाेकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये अडथळे आणत असल्याचे पत्र पाठविले. या पत्राने जिल्ह्यात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, संपूर्ण जिल्ह्यात हाच विषय चर्चिला जात आहे. यासंदर्भात खा. भावना गवळी यांचे मत जाणून घेतले असता, रस्ते विकास कार्यात अडथळे नव्हे, तर नागरिकांच्या समस्यांना आपण रीतसर, नियमानुसार संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून साेडविण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाचे, कंत्राटदारांचे काेणतेही नुकसान हाेणार नाही असे कृत्य शिवसेनेतर्फे करण्यात आलेले नाही.

गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात मेडशी ते वाशिमदरम्यान हाेत असलेल्या १२ कि.मी. बायपासचे, मालेगाव ते रिसाेड या राष्ट्रीय महामार्गाचे एक पुलाचे, तर शेलूबाजार रस्त्यावरील काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबविल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात भावना गवळी यांनी नागरिकांच्या आलेल्या तक्रारी आपण स्वत: नितीन गडकरी यांच्याकडे केल्याचे म्हटले आहे. रिसाेड परिसरात पडलेले खड्ड्यांमुळे दाेन जणांचा जीव गेल्याने त्या भागातील शिवसैनिक प्रदीप माेरे यांनी आंदाेलन केले व रस्त्यावरील खड्डे बुजवून घेतले. यावर शिवसैनिक महादेव ठाकरे यांनी जाब विचारला व त्यासंदर्भात माझ्याकडे तक्रारी करण्यात आल्या. त्या तक्रारी मी स्वत:च नितीन गडकरी यांना पाठविल्या, तसेच यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही दिले. शेलू येथून जात असलेल्या कामामुळे व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरले, रस्त्यांवर पडलेले तडे, माेझरी येथील कामामुळे अनेक अपघात घडले. याच्या तक्रारी मला प्राप्त झाल्या. त्या मी संबंधितांकडे पाठवून दखल घेण्याची मागणी केली आहे. मी स्वत: सुरू असलेल्या कामावर जाऊन ना काेणते आंदाेलन केले, ना काेणती ताेडफाेड केली, असेही गवळी यांनी सांगितले. गडकरींच्या ‘लेटरबॉम्बमुळे’ अनेक दिवसांपासून कोरोनामुळे थांबलेल्या राजकीय चर्चा यानिमित्ताने सुरू झाल्या आहेत.

----------------------शिवसेनेचे लाेकप्रतिनिधी म्हणजे नेमके काेण?

शिवसेनेचे लाेकप्रतिनिधी म्हणजे नेमके काेण? जिल्हा परिषदेतील, पंचायत समितीतील हे लाेकप्रतिनिधी की अन्य लाेकप्रतिनिधी हे कळायला मार्ग नसल्याचेही खा. भावना गवळी म्हणाल्या. नागरिकांच्या प्राप्त तक्रारीवर नियमानुसार न्याय देण्याचे कार्य मी पूर्ण केले आहे, असे गवळी यांनी स्पष्ट केले.

--------------------------माहिती मागविली नाही

वाशिम जिल्ह्यातील धमकीसत्राच्या चाैकशीचे गृहविभागाने राज्याच्या पाेलीस महासंचालकांना पत्र पाठवून यासंदर्भातील तक्रारीबाबत अहवाल मागविला आहे. यासंदर्भात पाेलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्याशी चर्चा केली असता अद्याप आपणाकडून काेणतीही माहिती मागविली नसल्याचे त्यांनी सांगितले.