शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयावर बांधकाम कामगार व घरकुल धारकांचा मोर्चा

By admin | Updated: March 27, 2017 13:26 IST

डॉ. बाबासाहेब अांबेडकर चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर बांधकाम कामगार व घरकुलधारकांच्या मोर्चा काढण्यात आला.

वाशीम - बांधकाम कामगार व घरकुल मागणीधारक यांच्या प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व असंघटीत बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने २७ मार्च रोजी दुपारी १२ वाजता स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर बांधकाम कामगार व घरकुलधारकांच्या मोर्चा काढण्यात आला. मोचार्चे नेतृत्व भाकपचे राज्य सहसचिव कॉम्रेड तुकाराम भस्मे, परभणीचे मजूर कामगार नेते कॉम्रेड राजन क्षिरसागर, भाकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड संजय मंडवधरे व असंघटीत बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शेख सईद शेख हमजा यांनी केले. प्रधानमंत्री आवास योजनेचे वाशीम शहर व जिल्हयात प्रभावीपणे अंमलबजावणी करा. व सर्व गरजवंत व खऱ्या लाभार्थ्यांनाच या योजनेमध्ये समाविष्ट करुन लाभ द्यावा, बाधीत कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे. ज्यांच्या कुटुंबात जास्त व्यक्ती आहेत व ते कमी जागेत निर्वाह करतात त्यांना कुटुंब संख्येनुसार जागा व घरकुल मंजूर करावे. ग्रामीण भागातील वंचित व गरजवंत लोकांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात यावा. ज्यांना अजिबात घर नाही, जागा नाही अथवा कच्या घरात राहतात त्यांनाच प्रथम प्राधान्य देवून घरकुल द्यावे. गृहनिर्माणसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जाहिर करण्यात आलेला कर्जपुरवठा व व्याजातील सवलत याची वेगाने अंमलबजावणही करावी यासह अनेक मागण्यांसाठीसदर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कामगार संघटनेचे वाशीम शहर अध्यक्ष उमेश बन्सोड, मानोरा तालुका अध्यक्ष अब्दुल सलाम, बागवानपुरा शाखा अध्यक्ष शेख युसुफ, हुजेफानगर शाखा अध्यक्ष महंमद शफी, मोहसिनखान जब्बारखान, राजनी चौक शाखा अध्यक्ष कैलास नवघरे, सोपान कांबळे, बाबाराव कांबळे, संजय बाजड, वैजनाथ खडसे, जगजीवन मनवर, जयराम गायकवाड, सतिश वैरागडे, किरण मनवर, संजय अंभोरे, रमेश मुंजे पाटील, गजानन कांबळे, भिमराव राठोड, युनुसखान पठाण, अमोल रसाळ हिवरा रोहीला, साबेरखान पठाण हिवरा नारायण धामणे, राजू भांडेकर, भारत पाईकराव, रमेश खिल्लारे, सुभाष भालेराव, मुरलीधर पवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.