०००००००
शिष्यवृत्तीची रक्कम प्रलंबित !
वाशिम : जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांच्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजनेच्या रक्कमा आधार क्रमांक लिंक न केल्याने वा इतर त्रुटीमुळे प्रलंबित आहेत. संबंधित प्राचार्यांनी या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक करण्याची कार्यवाही करण्याचे आवाहन समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी गुरूवारी केले.
०००००
२०२ युवकांना मिळाला रोजगार !
वाशिम : कोरोनाच्या काळात बेरोजगारीच्या संकटावर मात करण्यासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन रोजगार मेळाव्यातून जवळपास २०२ युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला, असे जिल्हा उद्योजकता व कौशल्य विकास केंद्राने स्पष्ट केले.
००००००
सरपंच आरक्षण सोडतीकडे लक्ष
मालेगाव : सरपंच पदासाठी २ फेब्रुवारी रोजी तहसील स्तरावर आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. पूर्वीचेच आरक्षण निघणार की, आरक्षणात बदल होणार? याकडे राजकीय क्षेत्रासह इच्छुकांचे लक्ष लागून आहे.