शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैमनस्यातून चार जणांवर प्राणघातक हल्ला

By admin | Updated: September 1, 2015 01:43 IST

महागाव येथील घटना; तिघांची प्रकृती गंभीर

रिसोड : पूर्ववैमनस्यातून डव्हळे कुटुंबातील दोन सदस्यांनी जमधाडे कुटुंबातील चार जणांवर प्राणघातक हल्ला केला. यामधील तिघांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना अकोला येथे उपचारार्थ हलविण्यात आले. ही घटना रिसोड तालुक्यातील महागाव येथे ३१ ऑगस्टच्या पहाटे ३.३0 वाजताच्या सुमारास घडली. महागाव येथील स्वस्त दुकानदार संजय तुकाराम डव्हळे यांचे देवानंद जमधाडे व प्र तीक जमधाडे यांच्यासोबत कंट्रोलचे माल वाटपावरुन वाद झाला होता. दोघांचेही घर एकमेकांचे घरासमोर आहेत. त्यातच एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून डव्हळे व जमधाडे कुटुंबात धूसफुस सुरू होती. यामधून संजय डव्हळे व गजानन डव्हळे यांनी ३१ ऑगस्टला पहाटेच्या सुमारास देवानंद जमधाडे यांचे घरात घुसून मारहाण करणे सुरू केले. यात गजानन डव्हळे याने कोयत्याने (विळा) देवानंद यास मारहाण केली तर संजय डव्हळे याने कुर्‍हाडीचा घाव पुनम देवानंद जमधाडे हिच्या डोक्यावर मारला. पुनमची आई छायाबाई ही मारु नका म्हणून पुढे आली असता तिला जातीवाचक शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना घडत असताना शेजारी राहणारे सिद्धार्थ मनोहर जमधाडे व त्याची आजी वच्छलाबाई यांनी आरडाओरड करीत देवानंदचे घरी गाठले. वच्छलाबाईने अडविण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिलाही कोयत्याने मारले. यामध्ये वच्छलाबाईच्या हा ताची बोटे तुटली व कोयत्याचा दुसरा वार तिने खांद्याजवळ दंडावर झेलला. सिद्धार्थ जमधाडे याने पकडण्याचा प्रयत्न केला असता कोयता सोडून पळून गेला. या मारहाणी त जमधाडे कुटुंबातील वच्छलाबाई, देवानंद, पुनम हे गंभीर जखमी असून छायाबाईसुद्धा जखमी झाल्या. सर्व जखमींना प्राथमिक उपचार करुन अकोला येथे उ पचारासाठी हलविण्यात आले. संजय व गजानन डव्हळे हे दोन्ही आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. घटनास्थळाला पोलीस अधीक्षक विनीता साहू, उ पविभागीय पोलीस अधिकारी संग्राम सांगळे, ठाणेदार एम.ए. रउफ यांनी भेट देऊन माहिती घेतली. सदर घटनेची तक्रार सिद्धार्थ मनोहर जमधाडे (वय ३0) यांनी दिल्यावरुन पोलिसांनी विविध कलमानुसार आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर आरोपीला अटक करण्यात आली नव्हती.