शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

खाते क्रमांकाअभावी चार कोटीचा निधी परत जाणार

By admin | Updated: June 9, 2014 01:51 IST

वाशिम जिल्हयात गारपीटग्रस्तांना ५४.४५ कोटीचे निधीवाटप; अनेक शेतकर्‍यांचे खातेक्रमांक अपाप्त

सनत आहाळे / वाशिमजिल्हयात फेब्रुवारी व मार्च २0१४ मध्ये झालेल्या गारपीटीमुळे जिल्हयातील ५२९ गावांमधील हजारो शेतकर्‍यांचे विविध पिकांचे कोटयवधी रुपयांचे नुकसान झाले होते. या नुकसानी दाखल राज्य शासनाने जिल्हयातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी जिल्हा प्रशासनाकडे ४कोटी ४ लाख ४२ हजार ८९८ रुपयांच्या निधीचे शेतकर्‍यांनी त्यांचे बॅक खाते क्रमांक न कळविल्याने वाटप होऊ शकले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी त्यांची खाते क्रमांक लवकर न कळविल्यास सदर शिल्लक मदतनिस शासनात परत करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर येण्याचे संकेत दिसत आहेत. सन २0१३ मध्ये पावसाळयात सुध्दा वारंवार अतवृष्टी झाल्याने सतत पाऊस पडल्याने पूर आले,पावसाळयात अतवृष्टी व सततच्या पावसाने सोयाबिन, उडीद, मुग व अन्य खरिप पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीतून स्वत:ला सावरत जिल्हयातील शेतकर्‍यांनी रब्बीच्या पिकांची पेरणी केली. रब्बीची पिके ऐन कापणीस येण्याच्या बेतात असतांना २३ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत जिल्हयात गावोगावी प्रचंड प्रमाणात गारपीट झाली. या गारपीटीमध्ये जिल्हाभरातील ५२९ गावांमधील हजारो हेक्टर शेतामधील पिकांचे अतोनात नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचे सर्वेक्षण करुन राज्य शासास अहवाल पाठवला त्या अहवालानूसार राज्य शासनाने वाशिम जिल्हयातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत म्हणून ५९ कोटी रुपयांचा निधी पाठवला. या निधीपैकी आतापर्यंत ५४ कोटी ९५ लाख ५७ हजार १0२ रुपयांचे वाटप जिल्हा प्रशासाने केले आहे. मात्र शेतकर्‍यांना वारंवार आवाहने करुनही शेतकर्‍यांनी त्यांचे बँक खातेक्रमांक कळविले नाहीत. त्यामुळे ४ कोटी ४ लाख ४२ हजार ८९८ रुपयांचा निधी अद्यापही वितरीत होऊ शकलेला नाही. तो लवकर वितरीत न झाल्यास या महिना अखेर शासनास परत केला जाण्याचे संकेत आहेत.