शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

हत्येप्रकरणी पाच दिवसांची पोलीस कोठडी

By admin | Updated: September 8, 2015 02:10 IST

वैभवचे अपहरण करून हत्या करणा-या आरोपीस ११ सप्टेंबरपर्यत पालीस कोठडी.

वाशिम : चौदा वर्षीय वैभव महाले या बालकाचे अपहरण करून त्याची हत्या करणार्‍या मदन वानखेडे याला विद्यमान न्यायालयाने ११ सप्टेंबरपर्यंंत पोलीस कोठडी सुनावली. मावशीचा एकुलता एक मुलगा वैभव महाले याची हत्या करून मावशीकडे दत्तक जायचे. दत्तक गेल्यानंतर मावशीची पाच एकर जमीन आपल्या नावी करून घ्यायची. असा बेत गेल्या दोन वर्षांपासून मदन वानखेडे याने आपल्या मनामध्ये आखला होता. आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला तब्बल दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागली. अखेर ३ सप्टेंबर या दिवशी मदन वानखेडे याने आपली मावशी व त्यांच्या कुटुंबीयाचा विश्‍वासघात करून वैभव महाले याला सोबत घेऊन बिटोडा तेली येथील गजानन महाराजांचे दर्शन घेऊन येतो, असे सांगितले. आपल्या आईनेही गजानन महाराजांचे दर्शन घेऊन येण्यासाठी वैभवला अनुमती दिली; परंतु आपल्या भाचाच्या मनातील क्रूर डावाची पुसटशी कल्पनाही तिला आली नाही. महाराजांचे दर्शन घेऊन रात्री उशिरापर्यंंत मुलगा व भाचा का परतले नाही, याची चिंता सतावत होती. गजानन महाराजांचे दर्शन घेण्याआधीच क्रूर नियतीच्या भाच्याने वैभवची जीवनयात्रा संपवून टाकली; परंतु ही बाब वैभवच्या कुटुंबीयांना चार दिवसानंतर कळाली. पोलिसांनी आरोपी मदन वानखेडे याचा कसुन शोध घेऊन त्याला ६ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले असता त्याने वैभवची हत्या केल्याची कबुली दिली. वैभवच्या हत्याकांडामध्ये आणखी कुणाचा समावेश आहे काय? या सर्व बाबी पोलीस मदनकडून माहिती करून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. ७ सप्टेंबर रोजी न्यायालयाने वानखेडे याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती ठाणेदार विनायक जाधव यांनी दिली.