मालेगाव(जि. वाशिम), दि. ११- तालुक्यातील वडप येथे १0 मार्च रोजी रात्री लागलेल्या आगीत ३0 हजार रुपये किमतीचा चारा भस्मसात झाला.याबाबत अधिक माहिती अशी की, वडप येथील रामराव तुकाराम गायकवाड यांच्या मालेगाव-मेहकर राज्य महामार्गावरील गजानन पेट्रोल पंपासमोरील शेतात कुटार व कडबा रचून ठेवला होता. १0 मार्चच्या रात्री अचानक आग लागून १२ ट्रॉली कुटार, ५ ट्रॉली कडबा भस्मसात झाला. घटनास्थळास तलाठी योगेश नागे यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी भेट देऊन पंचनामा केला.
वडप येथे आग; ३0 हजाराचे नुकसान
By admin | Updated: March 12, 2017 01:53 IST