शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

पवनचक्क्यांचे तुटले पाते; ऊर्जानिर्मिती ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 22:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: स्थानिक जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासह इतरही प्रशासकीय कार्यालयांवर लावण्यात आलेल्या पवनचक्क्या (अपारंपरिक ऊर्जास्त्रोत) देखभाल-दुरूस्तीअभावी नादुरूस्त अवस्थेत बंद पडल्या आहेत. यामुळे केवळ देखभाल-दुरूस्तीअभावी अपारंपरिक ऊर्जास्त्रोत निर्मितीची व्यवस्था उभी असूनही संबंधित कार्यालयांना महिन्याकाठी हजारो रुपये वीज देयक भरावे लागत असून पवनचक्क्या उभारणीसाठी लागलेला लाखो रुपयांचा खर्च देखील पूर्णत: ...

ठळक मुद्देप्रशासकीय कार्यालयांचे दुर्लक्षदेखभाल-दुरूस्तीबाबत उदासिनता

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: स्थानिक जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासह इतरही प्रशासकीय कार्यालयांवर लावण्यात आलेल्या पवनचक्क्या (अपारंपरिक ऊर्जास्त्रोत) देखभाल-दुरूस्तीअभावी नादुरूस्त अवस्थेत बंद पडल्या आहेत. यामुळे केवळ देखभाल-दुरूस्तीअभावी अपारंपरिक ऊर्जास्त्रोत निर्मितीची व्यवस्था उभी असूनही संबंधित कार्यालयांना महिन्याकाठी हजारो रुपये वीज देयक भरावे लागत असून पवनचक्क्या उभारणीसाठी लागलेला लाखो रुपयांचा खर्च देखील पूर्णत: व्यर्थ ठरत असल्याचे दिसून येत आहे.वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छतावर सौरऊर्जा संयंत्रांसोबतच पवनचक्की संयंत्रही बसविण्यात आलेले आहे; परंतू ते गेल्या अनेक महिन्यांपासून नादुरूस्त असल्याने दोन्हीही प्रकारे तयार होणारी वीजनिर्मिती पूर्णत: ठप्प होवून महावितरणकडून पुरविली जाणारी वीज वापरली जात आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरातही सहाठिकाणी पवनचक्की संयंत्र लावण्यात आलेले असून त्यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र, सोसाट्याच्या वाºयाने यातील बहुतांश संयंत्रांचे पाते तुटून खाली पडले असून ते पुन्हा लावण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. परिणामी, यामाध्यमातून सुरू झालेली वीजनिर्मिती देखील ठप्प झाली आहे. यायोगे अपारंपरिक ऊर्जास्त्रोत वापरासंबंधी शासनाने चालविलेले प्रयत्न निव्वळ फार्स ठरत असल्याचे सिद्ध होत आहे.जिल्हाधिकारी कार्यालयावरील सौरऊर्जा संयंत्र आणि पवनचक्कीच्या दुरूस्तीबाबत प्रयत्न सुरू आहेत. यानुषंगाने मिटकॉनकडे पत्रव्यवहार करून संबंधित कंत्राटदारास ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकण्याबाबत कळविण्यात आले आहे. यासह खासगीत कंत्राटदाराशी बोलून दुरूस्तीचा खर्च काढून तशी तरतूद करण्याची बाब प्रस्तावित आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी काढला जाईल.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम