शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

उपोषणाचा बुधवार

By admin | Updated: August 14, 2014 02:06 IST

विविध मागण्यांसाठी विविध संघटनांच्यावतीने वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडण्यात आले.

वाशिम : विविध मागण्यांसाठी विविध संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, उपोषण आंदोलन छेडण्यात आले.मानवी हक्क सुरक्षा दलाच्या वतीने प्रदेश महासचिव गजानन खंडारे व जिल्हाध्यक्ष आत्माराम सुतार यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु करण्यात आले आहे. सदर निवेदनकर्त्यांनी उपविभागीय अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनामध्ये आपल्या विभागात येणार्‍या गावात ज्या भुमिहीन लोकांनी महसूल व वन विभागाच्या पडीत जमिनीवर अतिक्रमण केले आहेत. त्यांची जमिनीच्या मुळ रेकॉर्डला नोंद होण्याचे निर्देश देवून प्रतिवेदात्मक अहवाल बनविण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी नमुद केली आहे. भूमिहीन, बेघर कुटुंबाला न्याय देण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र, अजूनही याकडे कुणीच लक्ष दिले नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. उपोषण कर्त्यामध्ये जगदीशकुमार इंगळे, भारत अंभोरे, अशोक तिडके, जयसिंग आडे यांचा समावेश आहे. वाडी वाकद : रिसोड तालुक्यातील वाडी वाकद येथील गारपीट ग्रस्त शेतकर्‍यांना अर्थसाहाय्य मिळावे यासाठी समस्त गावकर्‍यांनी उपोषण सुरु केले आहे. फेब्रुवारी-मार्च २0१४ मध्ये झालेल्या गारपीटमध्ये वाडीवाकद गावचे अतोनात नुकसान झाले आहे. वाडी वाकद गावाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट देऊन गावकर्‍यांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या. त्यामुळे गावकर्‍यांच्या मदतीबाबतच्या अपेक्षा उंचाविल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्री परतीच्या मार्गावर निघाले आणि गावकर्‍यांच्या समस्याही जागेवरच राहिल्या, असे चित्र पाहावयास मिळत आहे. संबंधित कर्मचार्‍यांनी अनेक शेतकर्‍यांचा समावेश नुकसानग्रस्तांच्या यादीत केला नाही. त्यामुळे गावातील अनेक शेतकरी व पशुपालकांना नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागले आहे. प्रशासनाने आता तरी योग्य सर्वे करावा, कर्तव्यात दिरंगाई करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.