शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

By admin | Updated: January 26, 2016 02:22 IST

मैराळडोह, किन्हीराजा येथील नागरिकांचा समावेश

वाशिम: विविध मागण्या निकाली काढण्याच्या उद्देशाने जिल्हय़ातील काही गावांतील नागरिक प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलनाला बसले आहेत. प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी उपोषणाची दखल घेतील, या आशेतून उपोषणकर्त्यांची संख्या कमालीची वाढली असल्याचे दिसून येते. वाशिम: छत्रपती शिवरायाचे अंगरक्षक राहिलेल्या वीर जीवाजी महाले यांच्या प्रतापगड येथील प्रस्तावित स्मारक बांधकामाच्या भूमिपूजनास दिरंगाई होत आहे. या अन्यायाविरोधात नाभिक समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २५ जानेवारीपासून अर्धनग्न आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणात पांडुरंग वाघमारे, गजानन राऊत, अनिल पंडित, जगदीश आळणे, विष्णू पोफळे, प्रकाश गाडेकर, गजानन गाडेकर, मारोतराव सुरेकर, जगन्नाथ ठोंबरे, विजय सापाटे, दत्तराव जाधव या ११ जणांचा समावेश आहे. उपोषणाला खासदार भावना गवळी, आमदार अमित झनक, विष्णुपंत भुतेकर यांनी भेटी दिल्यात. मैराळडोह, किन्हीराजा व एरंडा येथील नागरिक गतवर्षीच्या अतिक्रमण सर्व्हेचा चौकशी अहवाल मिळण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महादेव धवसे यांच्या नेतृत्वात उपोषणाला बसले. घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी गत चार दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या रिसोड तालुक्यातील गोवर्धन येथील गावकर्‍यांचे उपोषण खासदार भावना गवळी यांच्या मध्यस्थीनंतर २५ जानेवारीला मागे घेण्यात आले. गावठाण वाढ करून जागा देण्याचे आश्‍वासन मिळाल्याने उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख महादेव ठाकरे, सुभाष तापडिया, आबादास शेळके, डॉ. सदानंद वाघ यांच्यासह ४0 उपोषणकर्ते उपस्थित होते.