शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

टनका येथील शेतकऱ्यांनी पुकारला संप!

By admin | Updated: June 1, 2017 20:20 IST

शासनाच्या धोरणाचा निषेध : शेकडो लीटर दुध गावातच दिले मोफत वाटून

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात राज्यशासन गंभीर नसल्याचा आरोप करीत गट ग्रामपंचायत टनका येथील शेतकऱ्यांनी १ जूनपासून बेमुदत संप पुकारला असून गावातील मंदिरासमोर ठिय्या मांडला आहे. त्याची सुरूवात म्हणून दैनंदिन शहरात येणारे शेकडो लीटर दुध आज गावातच वाटून देण्यात आले. शासन जोपर्यंत मागण्या मान्य करित नाही, तोपर्यंत संप कायम राहील, असा निर्धार गावकऱ्यांनी बोलून दाखविला आहे.शासनाच्या मनमानी कारभाराविरूद्ध संपूर्ण राज्यभरातील शेतकरी संपावर जाण्याची भूमिका घेत आहेत. वाशिम तालुक्यातील टनका येथील शेतकऱ्यांनी देखिल १ जुन पासुन गावातील मंदीरासमोर ठिय्या आंदोलन करून संपास जाहीर पाठींबा दर्शविला आहे. टनका, सोनगव्हान आणि झोडगा ग्रामपंचायतीने ३१ मे च्या ग्रामसभेत स्वीकृत केलेल्या ठरावानुसार ३१ मे रोजी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यानुषंगाने आज सकाळपासूनच दैनंदिन कामावर जाणारे शेतकरी गावातच ठिय्या मांडून बसले. सदर गावे पैनगंगा नदीच्या तीरावर वसल्याने येथे मासेमारी, दुग्धव्यवसाय व उन्हाळी भाजीपाला उत्पादन घेतले जाते. भाजीपाला, मासे व शेकडो लीटर दुध अनसिंग, कन्हेरगाव नाका आणि वाशिम जिल्ह्याच्या बाजारपेठेत विक्रीसाठी नेले जाते; परंतू आज कुठल्याच प्रकारचा शेतमाल बाजारपेठत न पाठविता शेकडो लीटर दूध देखील गावातच मोफत वाटून देण्यात आले, उर्वरित दुधाची रात्री घोटाई करण्याचा निर्धार करण्यात आला. या संपामुळे दैनंदिन दुधाचा उकडा असलेल्या कुटुंबाना, हॉटेल्सला ताजे दुध न मिळाल्याने त्यांची धावपळ झाली. शेतकऱ्यांनी भुईमुग देखील आज विक्रीसाठी बाजारपेठेत येवू न दिल्याने बाजारपेठतही शुकशुकाट दिसून आला. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून शासनाने त्या तत्काळ पूर्ण कराव्यात; अन्यथा वस्तूविनिमय पद्धतीची पुनरावृत्ती होऊन शेतकरी आपल्या गरजा गावातच पूर्ण करण्यासाठी समायोजन करेल, अशी प्रतिक्रीया संपामध्ये सहभागी शेतकऱ्यांनी दिली. सदर संपामध्ये गावातील शंकर कालापाड, कैलास इंगळे, विनोद गव्हाणे, हरिभाऊ गव्हाणे, गणेश शिंदे, देवराव हाटकर, रामचंद्र मस्के, गुनाजी धनगर, भिमराव इंंगळे, साहेबराव धवसे, विजय मार्कड, अंबादास फाडे, किशोर धवसे, सागर शिंदे, कुंडलीक मोरे, दिलीप इंगोले, सुरेश इंगोले आदी शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.