शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जाची रक्कम मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ; प्रशासन गप्प!

By admin | Updated: April 25, 2017 01:50 IST

कोंडाळामहाली : पीक कर्जाची रक्कम मिळविण्यासाठी बँकेमध्ये चकरा मारण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

कोंडाळामहाली : पीक कर्जाची रक्कम मिळविण्यासाठी बँकेमध्ये चकरा मारण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सोमवारी चकरा मारूनही रक्कम मिळाली नसल्याने शेतकऱ्यांना खाली हात परत जावे लागले.२४ एप्रिल रोजी दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पार्डीटकमोर येथे पीक कर्जाची रक्कम मिळविण्यासाठी परिसरातील शेतकरी बँकेत गेले होते. रक्कम नसल्याने या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. शेतकऱ्यांना किसान क्रेडिटद्वारे पीक कर्ज वाटप करण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना एटीएममधून पैसे निघत नाहीत. तसेच एटीएममधून ट्रान्सफर केलेल्या बचत खात्यामधूनसुद्धा रोख रक्कम बँकेमधून मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होऊन व्यवहार ठप्प झाले आहेत. शासन कॅशलेस व्यवहाराबाबत जनजागृती करीत असले, तरी सर्व शेतकऱ्यांना सर्वच व्यवहार कॅशलेसमध्ये करणे शक्य होत नाही आणि रोख रक्कम मिळत नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी २ लाख रुपये पीक कर्ज घेतले, तेवढी रक्कम एटीएममधून किंवा विड्रॉल स्लीपने एक महिन्यातही निघत नाही. त्याकरिता एक महिना बँकेत चकरा माराव्या लागण्याची शक्यता आहे. त्याकरिता लागणारा प्रवास खर्च, बुडणारी मजुरी, शारीरिक आणि मानसिक त्रास आदी बाबींचे कुणाला काही सोयरसुतक आहे का? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. अनेक शेतकऱ्यांनी दुसऱ्याजवळून एक महिन्यासाठी खासगी कर्ज काढून पीक कर्ज भरले. त्यांचे पैसे परत करण्याकरिता आता पैसे नसल्याने व्याजाचा भुर्दंड शेतकऱ्यांनाच बसणार आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.दोन दिवसांपासून बँक बंद असल्यामुळे कॅश आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही कॅश देऊ शकलो नाही. - सुुनील चौधरी, शाखाधिकारी, दि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा पार्डीटकमोर