शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे मंगरूळपीर तालुक्यातील शेतकरी त्रस्त

By admin | Updated: August 14, 2014 02:06 IST

वनविभागाचे दुर्लक्ष : पंचनामा करुन नुकसानभरपाईची मागणी.

मंगरुळपीर: तालुक्यातील अनेक गावांत वन्यप्राण्यांनी हैदौस घालून पिकांची नासाडी चालविल्यामुळे शेतकरी वैतागले आहेत. वनविभागाने या प्रकरणी लक्ष घालून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे.यंदा अत्यल्प पावसामुळे जंगल परिसरातील जलाशय, तलाव कोरडे ठण पडले आहेत. परिणामी वन्यप्राण्यांनी लोकवस्तीकडे आपला मोर्चा वळविला आहे. तालुक्यातील शेगी, सनगाव, मसोला, सायखेडा, वनोजा, दस्तापूर, वनोजा, तांदळी, भूर, चोरद, बोरव्हा, चांधई, चकवा आदि गावांत वन्यप्राण्यांनी उच्छाद मांडला आहे. ओलिताची व्यवस्था असलेल्या शेतशिवारात घुसून तहान भागविण्यासह हे वन्यप्राणी शेतामधील उभ्या पिकांवर ताव मारून शेतकर्‍यांचे नुकसान करीत आहेत. पिकांची नासाडी करणार्‍या वन्यप्राण्यांमध्ये प्रामुख्याने हरीण, माकड, रानडुक्कर आदिंचा समावेश आहे. पाण्याची व्यवस्था असलेल्या शेतकर्‍यांनी वांगी, टोमॅटो, आदिंसह पालेभाज्यांची लागवड केली आहे, तर काही शेतकर्‍यांच्या केळी, पपई, डाळींब आदि फळांच्या बागा आहेत. त्यामुळे त्यांना पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते; परंतु रानडुकरांसारख्या वन्यप्राण्यांचा शेतशिवारात मुक्त संचार असल्यामुळे शेतकर्‍यांच्या जिवाला धोकाही निर्माण झाला आहे. जीव मुठीत घेऊन शेतकरी पिकांना पाणी देण्यासह शेताची रखवाली करीत आहेत. गतवर्षी अतवृष्टी आणि गारपिटीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्यानंतर यंदा अवर्षणामुळे दूबार, तिबार पेरणीचे संकट त्याच्यावर ओढवले. एवढय़ा सगळय़ा संकटांचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांना वन्यप्राण्यांनीही त्रस्त करून सोडले आहे. उल्लेखनीय बाब, अशी की वन्यप्राण्यांकडून झालेल्या पिक नुकसानीचा पंचनामाही वनविभागाकडून करण्यात येत नाही किंवा शेतकर्‍यांना कसल्याही प्रकारची नुकसानभरपाईसुद्धा मिळत नाही. दुसरीकडे एखादवेळी हरीण, काळविटासारखा प्राणी शेतशिवारात कोण्या कारणामुळे दगावला, तर वनविभागाकडून शेतकर्‍याची कसून चौकशी केली जाते. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी या प्रकरणी त्वरीत लक्ष घालून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि शेतकर्‍यांच्या पिकाची नासाडी थांबवावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.