शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांचे लक्ष आता रब्बी पिकांच्या पेरणीवर!

By admin | Updated: September 7, 2015 00:13 IST

सरासरी कमी पाऊस झाल्याने खरीप पिकांच्या उत्पादनावर परिणाम; शेतक-यांचे लक्ष आता रब्बी पिकांकडे.

अकोला : पश्‍चिम विदर्भात यावर्षी सरासरी कमी पाऊस झाल्याने खरीप पिकांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे लक्ष रब्बी पिकांकडे लागले आहे. पण, रब्बी पिकासाठीही परतीच्या पावसावर अवलंबून राहावे लागणार असल्याने परतीचा पाऊस न आल्यास मात्र रब्बी हंगामातील पेरणी घटण्याची शक्यता आहे. २0१३-१४ मध्ये पश्‍चिम विदर्भात अतवृष्टी झाली. परतीच्या पावसानेही चांगलाच मुक्काम ठोकल्याने त्याचा फायदा रब्बी हंगामाला झाला होता. त्यामुळे पश्‍चिम विदर्भात गतवर्षी ८ लाख ४६ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी शेतकर्‍यांनी केली होती. पण २0१४-१५ मध्ये पावसाने दडी मारल्याने रब्बी पिकांची पेरणी कमी म्हणजे ३0 ते ४0 टक्के क्षेत्रावरच केली होती. यावर्षी पुन्हा पावसाचा खंड पडला आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील स्थिती वाईट असल्याने शेतकर्‍यांनी रब्बीचे नियोजन सुरू केले असले तरी डोळे मात्र परतीच्या दमदार पावसाकडे लागलेले आहेत. पश्‍चिम विदर्भातील शेतकरी रब्बी हंगामात सर्वाधिक हरभरा, तर पूर्व विदर्भात जवस या पिकाची पेरणी करतात. करडी, मोहरी व गहू या पिकांचा पेराही केला जातो. गहू पिकाला अलीकडे पाण्याची गरज असल्याने संरक्षित सिंचनाची ज्यांच्याकडे सोय आहे, ते शेतकरी गहू पेरणी करतात. तथापि, यंदा पश्‍चिम विदर्भातील काही धरणांमध्ये अल्प जलसाठा उपलब्ध आहे. नदी-नाल्यांचे पाणी संपूर्ण हंगामात पुरेल याची शाश्‍वती नसल्याने ओलिताचा गहू व इतर पिकांना पावसाची गरज आहे.

रब्बीचे स्वप्न

         पाऊस नसल्याने खरिपातील सर्वच पिकांनी माना टाकल्या आहे. परिपक्वतेला आलेले पीक काळवंडले आहे. असे असले तरी आशादायी शेतकरी रब्बी पिकाचे स्वप्न बघत आहे. गेल्यावर्षी अनेक शेतकर्‍यांनी खरिपात शेती कोरडी ठेवली होती. यावर्षी पश्‍चिम विदर्भातील १0 टक्केच्यावर शेतकर्‍यांनी खरिपात पेरणी केलेली नाही, त्या सर्व शेतकर्‍यांची भिस्त रब्बी हंगामावर आहे.