शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

दगड उमरा येथे क्रॉपसॅपअंतर्गत शेतीशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:37 IST

तालुका कृषी अधिकारी कार्यालय वाशिममार्फत राबविण्यात येत असलेल्या क्रॉपसॅपअंतर्गत दगड उमरा येथे २४ जुलै रोजी शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले ...

तालुका कृषी अधिकारी कार्यालय वाशिममार्फत राबविण्यात येत असलेल्या क्रॉपसॅपअंतर्गत दगड उमरा येथे २४ जुलै रोजी शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या शेतीशाळेत मार्गदर्शन करताना कृषी सहायक एस.बी. वानखडे यांनी सोयाबीनवर येणाऱ्या कीड व रोगांविषयी माहिती दिली, तसेच किडींची ओळख करून दिली. किडींचे प्रमाण आर्थिक नुकसान पातळीच्या खाली असल्यास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी, तसेच किडींचे प्रमाण आर्थिक नुकसान पातळीच्या जवळ किंवा वर असल्यास कृषी विद्यापीठाच्या शिफारसीप्रमाणे लेबल क्‍लेम कीटकनाशकांची फवारणी करण्याचा सल्ला त्यांनी दिला. या शेतीशाळेत प्रामुख्याने उपसरपंच जनार्दन किसन पाठे, संजय प्रकाश पाठे, कैलास वाणी, सुखदेव नारायण पाठे, नथुजी पाठे, आभिमन पाठे, प्रल्हाद पाठे इत्यादी शेतकरी उपस्थित होते.

-----

फवारणीदरम्यान काळजी घेण्याचे आवाहन

फवारणी करताना सुरक्षा किट वापरण्यासह वाऱ्याचा वेग जास्त असल्यास फवारणी शक्यतो टाळावी, तसेच वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये. शक्‍यतो, सकाळच्या वेळेला किंवा संध्याकाळी चार ते सहा या दरम्यान फवारणी करावी. कृषी केंद्रातून औषध खरेदी करते वेळेस पक्के बिल घ्यावे, असे आवाहन एस.बी. वानखडे यांनी शेतकऱ्यांना केले.