शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांना आकारले अवाजवी देयक, रुग्णालयांवर ओढवले संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:45 IST

सुनील काकडे वाशीम : कोरोना संसर्गाने बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या २२ खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून आकारलेल्या देयकांची ‘ऑडिट’ प्रक्रिया सध्या ...

सुनील काकडे

वाशीम : कोरोना संसर्गाने बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या २२ खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून आकारलेल्या देयकांची ‘ऑडिट’ प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. यासाठी गठित केलेल्या पथकांकडून सादर केलेल्या अहवालात काही रुग्णालये दोषी आढळली असून, संबंधितांनी रुग्णांकडून ६ लाख ४९ हजारांपेक्षा अधिक रक्कम नियमबाह्य घेतल्याचे आढळले आहे. अशी रुग्णालये पुन्हा कायद्याच्या कचाट्यात फसली आहेत.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या दोन्ही लाटांमध्ये आजपर्यंत एकूण ४१ हजार ७४४ व्यक्ती बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे; तर संसर्गाने आतापर्यंत ६३८ जणांचा मृत्यू झाला आहे. मध्यंतरीच्या काळात संसर्गाचे संकट अतितीव्र झाले असताना जिल्हा प्रशासनाने रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्याकरिता तातडीची उपाययोजना म्हणून वाशीम शहरासह इतर काही ठिकाणी २२ खासगी रुग्णालयांमध्ये शासकीय नियमांच्या अधीन राहून डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल व डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यास मंजुरी दिली. यादरम्यान सर्वच रुग्णालयांमध्ये दैनंदिन शेकडो कोरोना बाधितांवर उपचार करण्यात आले. त्यापोटी आकारण्यात येणारे देयक हे शासनाने घालून दिलेल्या नियमानुसारच असावे, असे बंधनकारक करण्यात आले होते.

दरम्यान, १ जूनपासून कोरोनाने बाधित रुग्णांच्या आकडेवारीत परिणामकारक घट होत गेली. विशेषत: खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या बाधितांचा आकडाही कमी झाला. यामुळे प्रशासनाने १४ जून ते ७ जुलै या कालावधीत डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल व डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरचा दर्जा काढून घेत, संबंधित रुग्णालयांच्या व्यवस्थापकांनी परवानगीच्या कालावधीत भरती असलेल्या कोविड रुग्णांच्या अभिलेखांची जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे गठित करण्यात आलेल्या १० पथकांकडून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने पथकांनी सर्वच रुग्णालयांचे ‘ऑडिट’ पूर्ण करून प्रशासनाकडे अहवाल सादर केला आहे. त्यात काही रुग्णालयांनी रुग्णांकडून नियमापेक्षा अधिक रकमेचे बिल आकारल्याचे निष्पन्न झाले आहे. ही रक्कम ६ लाख ४९ हजार ८५० असून, ती संबंधित रुग्णालयांकडून वसूल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

....................

‘नवजीवन’ला पैसे परत करण्याचे आदेश

वाशीम शहरातील नवजीवन क्रिटिकल केअर हाॅस्पिटलने २९ एप्रिल ते ३० जून २०२१ या कालावधीत १६७ कोरोना बाधितांवर उपचार केले. त्यातील २० रुग्णांकडून नियमापेक्षा अधिक रकमेचे देयक आकारल्याचा प्रकार यापूर्वी उघड झाला. त्यावरून संबंधित रुग्णालयास २९ हजार ९५० रुपये इतकी रक्कम रुग्णांना परत करण्याचे आदेश प्रशासनाने दिले. त्याचा अहवाल अद्याप अप्राप्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

................

कोट :

कोरोना काळात रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी २२ खासगी रुग्णालयांना डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल व डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरचा दर्जा देण्यात आला होता. संबंधितांनी शासनाने घालून दिलेल्या नियमानुसारच रुग्णांकडून देयक आकारणी करण्याच्या स्पष्ट सूचना होत्या. काही रुग्णालयांनी मात्र अवाजवी देयक आकारल्याचे लेखापरीक्षण तपासणीत निष्पन्न झाले. त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू आहे.

- शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशीम