शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

प्रत्येक पिकांत आंतरपिक घेणारे गाव ‘टो’

By admin | Updated: February 8, 2017 12:55 IST

प्रत्येक पिकात आंतरपिक घेवून सर्वाधिक उत्पन्न घेण्यामध्ये वाशिम तालुक्यातील ग्राम ‘टो’ गावाचा समावेश आहे.

फळबागेही आंतरपिक : शेतकऱ्यांच्या प्रयोगाला प्रशासनाचाही पुरस्कारनंदकिशोर नारे, ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. ८ - जिल्हयात अनेक गावातील वेगवेगळे वैशिष्टे आहेत. त्यापैकी एक म्हणजे वाशिम तालुक्यातील ग्राम ‘टो’ होय. जिल्हयात हळद उत्पादनासाठी शिरपूर जैन, काटा , मल्चिंग पध्दतीने शेती करण्यामध्ये मंगरुळपीर तालुका तर शेडनेटचे गाव म्हणून ओळख असलेले...  तसेच प्रत्येक पिकात आंतरपिक घेवून सर्वाधिक उत्पन्न घेण्यामध्ये ‘टो’ गावाचा समावेश आहे. या गावाच्या या प्रयोगाची प्रशासनाकडूनही दखल घेत २०१५-१६ मध्ये सदर प्रयोगाव्दारे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार देवून जिल्हाधिकारी यांचेहस्त सत्कारही करण्यात आला होता.घरचेच बियाणे, सोबत सेंद्रीय खताचा वापर करुन ‘टो’ गावचे शेतकरी थांबले नाहीत तर आंतरपिकाच्या विविध प्रयोगातून उत्पादनात वाढ करुन एक आदर्श निर्माण केला आहे. अनेक शेतकरी आंतरपिक घेतात परंतु ठरल्याप्रमाणे नेहमी त्याच त्या पिकांचा समावेश असतो, परंतु ‘टो’ येथील शेतकरी जे पीके घेतात ते ऐकल्यावर असेही होवू शकते, असे करता येते असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण होवून ते पाहणी करण्याकरीता जातात. येथीलच एका शेतकऱ्याने चक्क ५ आंतरपिके घेण्याची किमया यशस्वी करुन दाखविली आहे. त्याच पध्दतीने गावातील जवळपास प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात कोणते ना कोणते आंतरपिक घेवून उत्पादन वाढीसोबतच आपला विकास साधतांना दिसून येत आहे. ‘टो’ येथील शेतकरी सोयाबीनमध्ये तूर, गव्हात हरभरा, मोहरी घेतातचं शिवाय हळदीमध्ये सुध्दा अनेक शेतकरी उडीदाचे आंतरपिक घेत आहेत. तसेच भाजीपाला उत्पादक शेतकरी टोमॅटोमध्ये सांबार (कोथींबीर) आंतरपिक घेत आहेत. नगदी पिक म्हणून ओळख असलेल्या मिरची, टोमॅटो, आलू, गवार, जवस या पीकाचे उत्पन्न शेतकरी मोठया प्रमाणात घेत आहेत. सेंद्रीय शेतीव्दारे आंतरपिकाच्या माध्यमातून शेतामध्ये मिरचीचे उत्कृष्ट उत्पादन घेणाऱ्या प्रल्हाद कडुजी काकडे, सुदाम निवृत्ती काकडे यांचा २०१५ -१६ मध्ये जिल्हाधिकारी यांचेकडून गौरव करुन पुरस्कार देण्यात आला होता.फळबागेतही आंतरपिक‘टो’ येथील शेतकरी शेतात आंतरपिक तर घेतातचं शिवाय गावातील १५ शेतकऱ्यांकडे फळबाग आहे. या फळबागेतही आंतरपिक घेवून एक नविन प्रयोग करतांना दिसून येत आहेत. संत्रा, लिंबुच्या फळबागांमध्ये गहू, अ‍ॅपल बोर, पालक, सांबार, मेथी, कांदा इत्यादीआंतरपिक घेत आहेत. फळबागेतून मिळणारे उत्पादन तर मिळेलच परंतु या फळबागांना पाणी देतांना याच पाण्यावर आंतरपिकाला पाणी मिळून दुहेरी फायदा होवून उत्पन्न घेत आहेत.शेती व्यवसाय करीत असताना कोण्या एका पिकावर अवलंबून राहणे योग्य नाही. कारण वातावरणातील बदल, निसगार्चा लहरीपणा , वारंवार कोसळणारे शेतमालाचे भाव यामुळे शेतकरी आर्थीक संकटात सापडत आहेत. कमी अधिक कालावधीमध्ये येणाऱ्या पिकांमध्ये आंतर पीक घेणे फायदयाचे ठरते असा विश्वास टो येथील शेतकऱ्यांना असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.आंतरपिक घेतल्याने उत्पादनात दिड पटाने वाढ होते. तसेच प्रतिकुल परिस्थितीमध्ये १०० टक्के निराश झाल्यापेक्षा काहींना काही शेतकऱ्यांच्या हाती पेैसा मिळून देणारे आंतरपिक पध्दत आहे.- नामदेव काकडे , शेतकरी, ‘टो’