कार्यक्रमाची सुरुवात युवकांच्या सहकार्याने ग्रामसफाईपासून करून करण्यात आली. त्यानंतर सर्व गावातील प्रार्थनाप्रेमी, गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व उपासक, ज्येष्ठ आणि बालगोपाल तसेच महिला मंडळ व सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित सामुदायिक प्रार्थना करण्यात आली. यावेळी उपस्थित पाहुणे मंडळींचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर शाखाध्यक्ष अनिकेत बयस, उपाध्यक्ष मनोज उगले, मार्गदर्शक अजय बयस, कोषाध्यक्ष ऋषिकेश लांडकर, प्रसिद्धी प्रमुख हर्षद लाहे, सचिव ऋषिकेश घुले, संघटक सर्वेश शेटे, सहसचिव सूरज गाठे, सहसंघटक अजय सरोदे, सहायक वैभव मोडक, कृष्णा डहाके चेतन मानके, शैलेश मुंदे, शुभम मुंदे, हिम्मत नेवारे यांचा ग्रामगीता व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रा.तु.म. युवक विचार मंचाचे वाशिम जिल्हाध्यक्ष महेंद्रा सावके, अमर वानखडे, जिल्हा प्रवक्ते तथा राष्ट्रीय कीर्तनकार विवेक महाराज मुरूमकर, रवी मानव यांनी विचार व्यक्त केले. त्यानंतर सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य पंकजपाल महाराज व बालकीर्तनकार प्रज्वल टोंगे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, सूत्रसंचालक सप्तखंजिरीवादक कामलपाल महाराज यांच्या भाषणाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
हिवरा लाहे येथे राष्ट्रसंत युवक विचारमंचची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:23 IST