शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

वाशिम जिल्ह्यात ३२ पथके स्थापन

By admin | Updated: June 22, 2014 01:25 IST

साथ रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग सज्ज

वाशिम: पावसाळा आला की, दूषित पाणी व डासांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे ग्रामीण भागात विविध गावांमध्ये अतिसार, विषमज्वर, कॉलरा, कावीळ व अन्य प्रकारच्या साथरोगांचा प्रादुर्भाव होतो. म्हणूनच ह्यआला पावसाळा, आरोग्य सांभाळाह्ण असे म्हटले जाते. त्यामुळे पावसाळ्यात या रोगांची साथ उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी उपाययोजना म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने जिल्ह्यात जिल्हा ,तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर अशी एकूण ३२ साथरोग नियंत्रण पथके व ३२ साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.जिल्ह्यात ७ जून ते २ ऑक्टोबर या कालावधीत साथरोगाला आळा घालता यावा, यादृष्टीने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात एक असे २५ साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तसेच आरोग्य केंद्रात साथरोगांच्या नियंत्रणासाठी २५ साथरोग नियंत्रण पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकात एक वैद्यकीय अधिकारी, एक आरोग्य सहायक, एक परिचारिका, एक आरोग्यसेवक , एक परिचर व एक वाहनचालक असे कर्मचारी २४ तास सज्ज राहतील. या पथकाजवळ अँम्ब्युलन्समध्ये व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी किंवा आरोग्य सहायकाच्या कक्षात शासनाने निर्देशित केल्यानुसार साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक अशा २१ प्रकारच्या औषधाच्या कीट सज्ज राहणार आहेत. याप्रमाणेच जिल्ह्यातील सहा तालुकास्तरावर गटविकास अधिकार्‍यांच्या सहकार्याने तालुका आरोग्य अधिकार्‍यांच्या नियंत्रणाखाली सहा साथरोग नियंत्रण पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकात तालुका आरोग्य अधिकारी स्वत:, पंचायत समितीमधील आरोग्य विभागातील कर्मचारी, तसेच तालुका आरोग्य अधिकार्‍यांच्या कार्यालयातील एक आरोग्य सहायक, एक परिचर व गटविकास अधिकार्‍यांच्या सहकार्याने एक वाहनचालक आदी कर्मचार्‍यांचा समावेश आहे.