शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर कोरोनाविषयक नियमांची अंमलबजावणी ; ‘आनंद मेला’त का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:19 IST

देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली येत असून, कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार ...

देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली येत असून, कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहेत. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासंदर्भात शासन, प्रशासनातर्फे जनजागृती, वेळप्रसंगी दंडात्मक कारवाईदेखील केली जात आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले असले तरी कोरोनाविषयक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे केले जाते. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आहे तसेच लग्नसमारंभात ५० पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नाही. या सर्व नियमांना स्थानिक जिल्हा क्रीडासंकुल येथील ‘आनंद मेला’ अपवाद ठरत आहे. ‘आनंद मेला’त कोरोनाविषयक नियमांची अंमलबजावणी होते की नाही, यासंदर्भात २२ जानेवारी रोजी रात्री ८ ते १० या वेळेत रिअ‍ॅलिटी चेक केले असता, गंभीर बाबी समोर आल्या. प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझरची व्यवस्था आहे. आतमध्ये मात्र गर्दीचा उच्चांक दिसून आला. अनेकजण मास्कचा वापर करीत नाहीत तसेच फिजिकल डिस्टन्सिंग तर कुठेच आढळून आले नाही. यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मास्कचा वापर केला नाही तर दुचाकीचालकांना दंड ठोठावला जातो, मग ‘आनंद मेला’त या नियमांची अंमलबजावणी का नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

००००

‘नो मास्क, नो एन्ट्री’ नावालाच

आनंद मेला येथे ठिकठिकाणी ‘नो मास्क, नो एन्ट्री’ असे फलक लावण्यात आले आहेत. मात्र, याची अंमलबजावणी तेथे कार्यरत कामगारांकडून होत नसल्याचे दिसून आले. ‘नो मास्क, नो एन्ट्री’ असा फलक असलेल्या ठिकाणी कार्यरत कामगारच विनामास्क राहत असल्याने कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव झाला तर याला जबाबदार कोण? हा महत्वाचा प्रश्न आहे.

००००

कोरोनाविषयक नियमांची अंमलबजावणी केली जाईल, या अटीवरच जिल्हा क्रीडासंकुल येथे ‘आनंद मेला’ला परवानगी दिली आहे. या अटी व नियमाचे उल्लंघन झाले तर परवानगी रद्द करण्यात येईल, अशा सूचनाही दिल्या. यासंदर्भात माहिती घेतली जाईल.

- चंद्रकांत उप्पलवार

जिल्हा क्रीडा अधिकारी, वाशिम

०००

तहसील प्रशासनाकडून ‘आनंद मेला’साठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनाविषयक नियमांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

- विजय साळवे

तहसीलदार, वाशिम