शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

शंभरापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठ्याची वीज कपात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 19:10 IST

वाशिम : जिल्ह्यातील शंभरापेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी थकीत विद्यूत देयक अदा करण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे महावितरणने पाणीपुरवठा योजनेची विज खंडित करण्याची कारवाई केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वारंवार आवाहन करूनही जिल्ह्यातील शंभरापेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी त्यांच्याकडील थकीत विद्यूत देयक अदा करण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे महावितरणने पाणीपुरवठा योजनेची विज खंडित करण्याची कारवाई केली आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांनी मंगळवारी दिली.जिल्ह्यातील ४९१ पैकी ४४३ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांना महावितरणकडून वीज पुरविली जाते. त्यातील २५८ ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा योजनेचे विद्यूत देयक अदा केलेले नाही. साधारणत: वर्षभरापेक्षा अधिक कालावधीपासून प्रलंबित असलेली विद्यूत देयकांची ही रक्कम ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे मार्च २०१७ या महिन्यापासूनच संबंधित थकबाकीदार ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनेची विज खंडित करण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली होती. त्यामुळे २५८ पैकी साधारणत: १५० ग्रामपंचायतींनी थकबाकी अदा करून विज पुरवठा सुरळित करून घेतला. मात्र, शंभरावर ग्रामपंचायतींनी अद्याप विद्यूत देयक अदा केलेले नाही. १७ जुलैअखेरच्या थकबाकीदार ग्रामपंचायतींमध्ये वाशिम तालुक्यातील २२, मालेगाव तालुक्यातील १९, रिसोड तालुक्यातील १८, मंगरूळपीर तालुक्यातील १४, मानोरा तालुक्यातील १२; तर कारंजा तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींचा समावेश असल्याची माहिती कार्यकारी अभियंता मेश्राम यांनी दिली.जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा योजनेची थकबाकी दिवसेंदिवस वाढत चालली असून ती वसूल करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अपेक्षित प्रतिसाद मिळणे कठीण झाले आहे. संबंधित थकबाकीदार ग्रामपंचायतींनी त्यांच्याकडे असलेल्या थकबाकीपोटी किमान चालू महिन्याचे देयक आणि व जुन्या थकबाकीपैकी किमान ३0 ते ४0 टक्के रक्कम भरुन महावितरणला सहकार्य करायला हवे. - विजय मेश्राम, कार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम.