शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धेने दिली दहा तास मृत्यूशी झुंज

By admin | Updated: January 23, 2016 02:05 IST

दैव बलवत्तर म्हणून म्हातारीचे वाचले प्राण; बालकांनी दाखवली समयसूचकता.

शंकर वाघ / शिरपूर जैन (जि. वाशिम): पहाटेची वेळ.. ८0 वर्षीय वृद्ध महिला शौचाकरिता बाहेर जात असताना ३५ फूट खोल कोरड्या विहिरीमध्ये पडल्याची घटना २१ जानेवारी रोजी सकाळी ७.३0 वाजेदरम्यान घडली. तब्बल दहा तास ही बाब कोणाच्याच लक्षात न आल्याने वृद्धेने मृत्यूशी झुंज दिली. मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील ओंकार कॉलनीतील रस्त्याच्या कडेला उघडी विहीर आहे. सदर विहिरीला कोणत्याही प्रकारचे कठडे किंवा ओटा नसल्याने येथे विहीर असल्याचे दिसून येत नाही. सध्या हिवाळयाचे दिवस असल्याने पहाट थोडी उशिराच होते. २१ जानेवारी रोजी सकाळी ७.३0 वाजताच्या दरम्यान ओंकार कॉलनी भागात राहणारी ८0 वर्षीय वृद्ध महिला सुभद्राबाई नवृत्ती जानोळकर ही सकाळी शौचास जात असताना तोल जाऊन त्यामध्ये पडली. विहीर परिसरात कोणीही राहत नसल्याने याकडे कुणाचेही लक्ष जात नव्हते. संध्याकाळ होण्याच्या आधी ५ वाजताच्या दरम्यान काही बालके या परिसरात क्रिकेट खेळण्यासाठी आले व खेळायला लागले. बराच वेळ खेळून झाल्यानंतर बॉल विहिरीच्या दिशेला गेला. तेव्हा यातील एका जणाचे लक्ष त्या म्हातारीकडे गेले. तसेच याच दरम्यान सकाळपासूनच म्हातारी दिसून येत नसल्याने नातेवाईकही शोध घेत विहिरीपर्यंंत पोहचले होते. सकाळी ७.३0 ते ५ वाजेपर्यंंत म्हातारी विहिरीत मदतीसाठी ओरडत असल्याने तिच्यामध्ये थोडाही त्राण नव्हता. तसेच विहिरीत पडल्याने तिच्या डोक्याला व हाताला मार लागला. उपस्थितांनी खाट दोर बांधून आत सोडली व म्हातारीला बाहेर काढले. बालकांच्या सतर्कतेने व वृद्धेचे दैव बलवत्तर असल्याने दहा तास मृत्यूशी झुंज देणार्‍या वृद्धेचे प्राण वाचले.