शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कृतीतून विद्यार्थ्यांंना शिक्षण; टोपींचा वापर

By admin | Updated: September 21, 2016 02:17 IST

धोडपची जिल्हा परिषद शाळा : कॉन्व्हेंटचे १६ विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत परतले.

संतोष वानखडेवाशिम, दि. २0 - खासगी शाळांच्या बरोबरीत जिल्हा परिषदेच्या शाळा आणण्यासाठी शिक्षक व शिक्षण विभागाने पुढाकार घेतल्याने ग्रामीण भागातही विद्यार्थ्यांंना 'अच्छे दिन' नजरेत पडत आहेत. रिसोड तालुक्यातील धोडप जिल्हा परिषद शाळेने कृतीतून शिक्षण देण्यासाठी विद्यार्थ्यांंच्या डोक्यांवर माहितीदर्शक टोपी घातल्या आहेत. याबरोबरच कृतीयुक्त शैक्षणिक साहित्यांचा वापर केल्याने यावर्षी कॉन्व्हेंटमधून तब्बल १६ विद्यार्थी धोडपच्या जिल्हा परिषद शाळेत परतले आहेत.धोडप जिल्हा परिषद शाळेत वर्ग एक ते सातची सुविधा असून, विद्यार्थी संख्या २0७ अशी आहे. येथे मुख्याध्यापकांसह सात शिक्षक आहे. गत वर्षापासून मनोरंजनात्मक व कृतीयुक्त शिक्षण, ज्ञानरचनावाद आदी उपक्रम राबविले जात आहेत. याहीपलिकडे जाऊन धोडप येथील जिल्हा परिषद शाळेने डेक्स-बेन्च तसेच टोपींवर विविध प्रकारची माहिती लिहून विद्यार्थ्यांंना कृतीतून शिक्षण देण्याला प्रारंभ केला आहे. एखाद्या विषयातील सविस्तर माहिती त्या-त्या वर्गातील विद्यार्थ्यांंंच्या टोपीवर लिहिली जाते. वर्ग तिसरीतील विद्यार्थ्यांंच्या टोपीवर देशातील सर्व नद्यांची नावे लिहिण्यात आली आहेत. याप्रमाणे जिल्ह्यातील तालुके, राज्यातील जिल्हयांची नावे लिहिण्यात आली आहेत. सदर माहिती विद्यार्थ्यांंंच्या नजरेत दररोज पडत असल्याने विद्यार्थ्यांंंची ह्यघोकमपट्टीह्ण आपसूकच कमी होईल, असा विश्‍वास शिक्षक व्यक्त करीत आहेत. या शाळेत बचतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यार्थी बचत बँक सुरू केली आहे. दत्तक पालक योजनेंतर्गत सात शिक्षकांनी सात विद्यार्थी दत्तक घेतले असून, त्यांना शैक्षणिक साहित्य पुरविले जाते. शाळेच्या भिंतीवर विविध प्रकारची माहिती लिहून भिंतीही बोलक्या बनविल्या आहेत. विद्यार्थ्यांंंमध्ये ह्यस्टेज डेअरिंगह्ण आणण्यासाठी वादविवाद स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिल ेजाते. विविध प्रकारच्या उपक्रमामुळे आणि शाळेचे पालटलेले रुपडे पाहून १६ विद्यार्थी कॉन्व्हेंटमधून पुन्हा या जिल्हा परिषद शाळेत परतले आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात मुख्याध्यापक गुलाबराव आवले, दिलीप पंडीत, कैलास मानवतकर, सुभाष कसाब, सुरेश रंजवे, महादेव जायभाये, श्रीनिवास कडेकर यांनी या विशेष उपक्रमांसाठी पुढाकार घेऊन इतरांसमोर आदर्श निर्माण केला.