शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबीनचे उत्पादन घटले!

By admin | Updated: January 7, 2015 01:03 IST

मंगरुळपीरची स्थिती; कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आकडेवारीचा निष्कर्ष.

नाना देवळे/ मंगरूळपीर (वाशिम):यंदाच्या दुष्काळी स्थितीमुळे गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीनचे उत्पादन निम्म्यावर आले असल्याचे मंगरुळपीर कृषी बाजार समितीमधून घेण्यात आलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. या अवषर्णामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट होत आहे.विविध आपत्तींचा सामना करणार्‍या शेतकर्‍याला यंदा निसर्गाने चांगलेच त्रस्त केले आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला. शेतीची सर्व कामे करून जमीन पेरणीसाठी तयार केल्यानंतरही पावसाने वेळेवर हजेरी न लावल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला. उशिराने आलेल्या थोड्याफार पावसाच्या आधारे अनेक शेतकर्‍यांनी महागड्या बियाण्यांची पेरणी केली; परंतु त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारल्यामुळे शेतकर्‍यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले आणि यात बराच वेळ निघून गेल्याने मूग, उडीदाच्या पिकांची वेळही राहिली नाही. पर्यायाने शेतकर्‍यांनी बहुतेक करून कमी खर्चाचे पीक म्हणून सोयाबीनची पेरणी केली. निकृष्ट बियाण्यांमुळे कित्येकांच्या शेतातील सोयाबीन उगवलेच नाही. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने दिलेल्या आधारामुळे सोयाबीन चांगलेच बहरले आणि शेतकर्‍याच्या चेहर्‍यावरही हिरवळ निर्माण झाली; परंतु ती फार काळ टिकलीच नाही आणि पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील सुकत चाललेल्या ऐन शेंगा धरलेल्या सोयाबीनप्रमाणे शेतकर्‍यांचा चेहराही सुकत चालला होता. याच दरम्यान पिवळा मोझ्ॉक, चक्रीभुंगा आदी रोगांनीही सोयाबीनवर आक्रमण केल्याने या पिकाच्या उत्पन्नात मोठी घट आली. कित्येक शेतकर्‍यांच्या शेतात, तर एकरी ५0 किलोएवढेच उत्पन्न झाले. पावसाने दगा दिल्यामुळे सोयाबीनचे उपन्न घटल्याने अनेकांनी या पिकाच्या काढणीसाठी मजूरही लावले नाही. या कित्येक शेतकर्‍यांनी पिकावर केलेला खर्चही वसूल झाला नाही. गतवर्षी १ एप्रिल २0१३ ते ३१ मार्च २0१३ पर्यंत मंगरुळपीरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण ७ लाख ४0 हजार ६0३ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती, तर यावर्षीच्या हंगामात मात्र १ एप्रिल २0१४ ते ३१ डिसेंबर २0१४ पर्यंंत केवळ २८९ हजार ४६३ क्विंटल सोयाबीनचीच आवक झाली आहे.