शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

औषध विक्रेत्यांनी संपात सहभागी होऊ नये!

By admin | Updated: May 30, 2017 01:44 IST

सहायक आयुक्त : ‘आयएमए’च्या अधिपत्याखालील रुग्णालयांनी औषध उपलब्ध ठेवण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट’ने मंगळवार, ३० मे रोजी पुकारलेल्या बंदमध्ये जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी सहभागी होऊ नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त रा. ल. पाटील यांनी केले आहे.औषध विक्रेत्यांच्या संपामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये, याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्यावतीने जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) यांनी आपल्या आधिपत्याखालील सर्व रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचनाही संबंधिताना देण्यात आल्या आहेत. तथापि, औषध विक्रेत्यांनी जनहित लक्षात घेता ३० मे च्या बंदमध्ये सहभागी न होता, सर्व आपली दुकाने सुरु ठेवावीत. जेणेकरून गरीब रुग्णांची व जनतेची गैरसोय होणार नाही, अशी विनंती संघटनेकडे करण्यात आल्याचे सहायक आयुक्तांनी कळविले आहे. संप काळात जिल्ह्यात या ठिकाणी मिळतील औषधेरुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने अत्यावश्यक स्थितीदरम्यान औषध उपलब्ध करून देण्यासाठी काही मेडिकल्सला परवानगी दर्शविली आहे. त्यात वाशिममधील पुसद नाकास्थित गायत्री मेडिकल्स, लाखाळा येथील रुद्र एजन्सीज, बसस्थानकामागील आधार मेडिकोज, राजनी विहीर येथील गणेश मेडिकल, रिसोडमधील गणेश मेडिकल्स, मालेगावमधील अकोला मेडिकल स्टोअर्स, बाजार लाइन येथील साईनाथ मेडिकल, मंगरूळपीरमधील गणेश मेडिकल, पोस्ट आॅफिसजवळील बाहेती मेडिकल, मानोरामधील सोहम मेडिकल, मंगलमूर्ती मेडिकल, कारंजामधील शिवम मेडिकल, गांधी चौक येथील मिलिंद मेडिकल येथे तातडीच्या काळात औषध मिळणार असल्याचे कळविण्यात आले आहे.