शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना दुष्काळी मदतीची आस

By admin | Updated: December 30, 2015 01:56 IST

केंद्राची मदत जाहीर; गतवर्षी वाशिम जिल्ह्याला मिळाले होते ५७.५३ कोटी.

वाशिम : राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारचा निधी जाहीर झाला असून, महाराष्ट्रासाठी ३0५0 कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर केले आहे. यापैकी वाशिम जिल्ह्याला किती पॅकेज मिळणार, याकडे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे लक्ष लागून आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील दुष्काळाबाबत केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. त्यात महाराष्ट्राला ३0५0 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय झाला. वाशिम जिल्ह्याला सलग तिसर्‍या वर्षी दुष्काळसदृश स्थितीचा फटका बसला आहे. दुष्काळाबाबत तलाठी, महसूल विभाग, नजर आणेवारी, सुधारित आणेवारी, केंद्रीय पथकाची पाहणी असा शासकीय सोपस्कार पार पडला असून, सर्व अहवाल पाहता जिल्ह्याला भरीव स्वरुपाचा दुष्काळी मदत निधी मिळण्याची शेतकर्‍यांना अपेक्षा आहे. जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ५0 पैशापेक्षा अधिक होती; मात्र सत्ताधारी आमदारांचा पाठपुरावा आणि विरोधकांचे आंदोलन यामुळे जिल्ह्यातील सर्व ७९३ महसुली गावांची सुधारित पैसेवारी ४४ पैसे जाहीर झाली होती. कारंजा ४२, मानोरा ४५, वाशिम ४३, मंगरुळपीर ४४, रिसोड व मालेगावची सुधारित पैसेवारी प्रत्येकी ४६ अशी आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर होण्याची अपेक्षा होती; मात्र तसे झाले नसल्याने शेतकर्‍यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता दुष्काळी मदत निधी जाहीर झाल्याने जिल्ह्याला किती निधी मिळणार, त्याचे निकष काय, पॅकेजचे स्वरुप काय, आदी प्रश्नांच्या उत्तराकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागून आहे.