शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळसदृश परिस्थिती; शेतकरी चिंताग्रस्त

By admin | Updated: August 3, 2015 01:08 IST

वाशिम जिल्ह्यातील चार लाख हेक्टरवरील पेरणी प्रभावित.

वाशिम : गत एका महिन्यापासून पावसाचा पत्ता नसल्याने शेतातील खरिपाची पिके पाण्याअभावी जागेवरच करपून जात आहे. परिणामी दुबार पेरणीचे ढग अधिक गडद झाले आहे. जिल्ह्यात चार लाख ३३ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य असून, चार लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. मृग नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकर्‍यांनी तातडीने पेरण्या आटोपल्या. २९ जूननंतर रिमझिम पावसाचा अपवाद वगळता दमदार पाऊस झाला नाही. परिणामी, माळरानावरील पिके सुकून गेली तर आता चांगल्या प्रतीच्या शेतातील पिकेही सुकत आहेत. सिंचनाची सुविधा असणारे शेतकरी पिकांना वाचविण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत असल्याचे दिसून येते. सर्वात हलाखीची परिस्थिती मालेगाव तालुक्याची आहे. शिरपूर व झोडगा परिसराचा अपवाद वगळता मालेगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे पीक परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. गतवर्षीदेखील निसर्गाचा लहरीपणा शेतकर्‍यांनी झेलला आहे. निसर्गाने दगा दिल्याने जिल्ह्यातील बळीराजा पूरता हतबल झालेला आहे. अपेक्षीत उत्पादन हाती न आल्याने बळीराजाचे बजेट कोलमडले आहे. दुष्काळाच्या छायेतून सावरत यावर्षी मृग नक्षत्रात शेतकर्‍यांनी एकदाच्या पेरण्या आटोपल्या. मात्र, त्यानंतर पाऊस गायब झाला. जवळपास एका महिन्यापासून पाऊस नाही. त्यामुळे हलक्या प्रतीच्या जमिनीतील पिके पूर्णत: सुकून गेली आहेत. दुबार पेरणीच्या संकटाने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. बँकांसह सावकारांकडून कर्ज घेऊन पेरणी केलेल्या शेतकर्‍यांवर कोरड्या दुष्काळाचे सावट असल्याने आता पुढे काय? या प्रश्नाने शेतकर्‍यांची झोप उडाली आहे. सलग तीन वर्षांपासून जिल्ह्यात कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळसदृश परिस्थिती राहिली आहे.