शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची रिपरिप थांबली, शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:45 IST

जिल्ह्यात यंदा ३ लाख ९७ हजार ६०७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली असून, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका या पिकांना ...

जिल्ह्यात यंदा ३ लाख ९७ हजार ६०७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली असून, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका या पिकांना वारंवार बसत आहे. जूनमध्ये मध्यंतरी पावसाने खंड दिला, तर जुलैच्या मध्यंतरानंतर अतिवृष्टीचा फटका पिकांना बसला. ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाचा खंड पडल्याने पिके संकटात सापडली होती. दरम्यान, गत आठवड्याच्या सुरुवातीपासून पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. सुकू लागलेल्या पिकांना या दमदार पावसामुळे संजीवनी मिळाली; परंतु पावसाने पिच्छाच पुरविला. दरदिवशी पाऊस पडत असल्याने शेतात पाणी साचून पिके पिवळी पडण्यासह पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकरीवर्गांत चिंतेचे वातावरण होते. आता रविवारपासून पावसाने उसंत घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांनी तण व्यवस्थापनाला वेग दिला असून, पिके चांगली बहरू लागली आहेत.

-----------------

सहा दिवसांत ७६ मि.मी. पाऊस

जिल्ह्यात सोमवार १६ ऑगस्ट ते शनिवार २१ ऑगस्टदरम्यान सहा दिवसांच्या कालावधीत ७६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी दुपारपासून जिल्ह्यात हजेरी लावणाऱ्या पावसाने ठाणच मांडले आहे. दोन-तीन तासांची विश्रांती घेत पाऊस दरदिवशी सर्वत्र हजेरी लावत होता. त्यामुुळेच पावसाच्या सरासरीतही मोठी वाढ झाल्याचे हवामान खात्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

-----------------

पिकांच्या वाढीवर परिणाम

मागील आठवड्यात पाऊसमान जास्त झाल्याने शेतात पाणी साचले होते. पाणी साचल्याने जमीन घट्ट होण्यासह पिकांच्या मुळांना जमिनीतून अपटेक (जमिनीतून उपलब्ध खताचे/अन्नद्रव्ये सेवन) मिळणे अशक्य होते. परिणामी पिकांची वाढ खुंटून मूळ अतिपाण्यामुळे कुजून पिवळी पडण्यासह बुरशी वाढून पिके धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती.

-----------

कोट : पावसाने उसंत घेतल्याने आता पिके चांगली वाढणार आहेत. शेतकऱ्यांनी शेतात पाणी साचले असेल, तर ते तातडीने काढून पिकांत हवा खेळती राहील, यासाठी उपाय योजना कराव्यात.

- शंकर तोटावार,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम.