शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांची हलगर्जी बेतली महिलेच्या जीवावर

By admin | Updated: July 28, 2014 01:51 IST

मालेगाव येथील घटना

मालेगाव : उपचारासाठी डॉक्टरकडे गेलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मालेगाव येथे घडली.प्राप्त माहितीनुसार कविता प्रमोद चव्हाण ही गर्भवती महिला २६ जुलैला मालेगाव येथील जाजू रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. डॉक्टरांनी महिलेची तपासणी केल्यानंतर पोटातील गर्भ खराब झाला असल्याचे चव्हाण यांच्या नातेवाइकांना सांगितले. त्यानंतर चव्हाण कुटुंबीयांनी गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या संमतीनेच डॉक्टरांनी गर्भपाताची प्रक्रिया सुरू केली; मात्र ही प्रक्रिया करीत असताना नेमका डॉक्टरांचा हलगर्जीपणा झाला. गर्भपातानंतर कविताचे कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी गेले. तेव्हा त्यांचे अंग थंड पडले होते. एवढेच नव्हे तर त्या बेशुद्धावस्थेत पडून होत्या. चव्हाण कुटुंबीयांनी ही बाब डॉक्टरांच्या कानावर घातली. त्यानंतर डॉ. जाजू यांनी कविताला उपचारासाठी तत्काळ वाशिम येथे हलविण्याचा सल्ला दिला.दरम्यान, मालेगाववरून येताना रस्त्यातच कविताची प्राणज्योत मालविली. या प्रकरणी विनोद विठ्ठलराव चव्हाण यांनी पोलिसात तक्रार दिली असून, पोलिसांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोग्य विभागाच्या मदतीने त्यांचा दवाखाना सील करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे ठाणेदारांनी सांगितले.