शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

दारूमुक्तीसाठी डॉक्टर दांपत्याचा पुढाकार; मोफत उपचारासह औषधीही देणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:48 IST

वाशिम : दारूच्या आहारी गेलेल्यांचे व्यसन सोडविण्याचा एक प्रयत्न म्हणून वाशिम शहरातील एका डॉक्टर दांपत्याने सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घेतला ...

वाशिम : दारूच्या आहारी गेलेल्यांचे व्यसन सोडविण्याचा एक प्रयत्न म्हणून वाशिम शहरातील एका डॉक्टर दांपत्याने सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घेतला आहे. दर महिन्याला किमान एक शिबिर घेऊन किमान ५० जणांची मोफत तपासणी आणि आवश्यक औषधीही मोफत दिली जाणार आहे. डॉ. विवेक साबू आणि डॉ. शुभांगी साबू असे या दांपत्याचे नाव आहे.

वाशिम येथे वैद्यकीय क्षेत्रात सेवा देत असताना, अपघाताच्या घटनांमध्ये काहींना जीव गमवावा लागणे, काहींना अपंगत्व येणे आदी बाबी डॉ. विवेक साबू यांना जवळून पाहता आल्या. अपघाताच्या काही घटनांमध्ये वाहन चालविणारा हा दारूच्या नशेत असल्याचेही दिसून आले. दारूच्या नशेपायी संसारातही कलह निर्माण होतो तसेच मानसिक स्वास्थही बिघडते. दारूच्या आहारी गेलेल्यांचे व्यसन सोडविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून डॉ. विवेक आणि डॉ. शुभांगी या साबू दांपत्याने सामाजिक बांधिलकीतून दरमहा मोफत शिबिर घेण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. दरमहा १ तारखेला होणाऱ्या या शिबिरात किमान ५० जणांची मोफत तपासणी आणि आवश्यक ती औषधीदेखील मोफत दिली जाणार आहे. दरम्यान, कारंजा येथील दारूमुक्तीचे कार्यकर्ता दिलीप गिलडा यांनी आतापर्यंत १५ हजार जणांचे दारूचे व्यसन सोडविले आहे. दारूचे व्यसन सोडण्यासंदर्भातील डॉ. साबू यांच्या उपक्रमाला गिलडा यांचे मार्गदर्शन लाभणार असून, ते दरमहा आयोजित शिबिरात प्रबोधन करणार आहेत.

..........

कोट

वैद्यकीय क्षेत्रात सेवा देत असताना कुठेतरी समाजाचे देणं आहे या उदात्त भावनेतून दारूमुक्तीसाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून दरमहा १ तारखेला मोफत शिबिर घेणार आहोत. दारूच्या व्यसनाचे दीर्घकालीन दुष्परिणाम असल्याने नागरिकांनीदेखील व्यसनाच्या आहारी जाऊ नये.

- डॉ. विवेक साबू, वाशिम