शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात इच्छुकांचा लोंढा

By admin | Updated: August 23, 2014 02:10 IST

काँग्रेस ४२, रा.काँ. १२, भाजपा १३, मनसे १२ व शिवसेनेचे १५ इच्छुक उमेदवार.

नंदकिशोर नारे / वाशिमवाशिम: जिल्हय़ातील तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वच राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांचा लोंढा दिसत असून, सर्वच इच्छुक उमेदवार बाशिंग बांधून निवडणूक लढविण्यासाठी तयारी दर्शवित आहेत. जिल्हय़ातील तिन्ही विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास महायुती, आघाडीतर्फे मतदारसंघ ठरलेले असताना जेथे काँग्रेसची दावेदारी आहे तेथे राष्ट्रवादी तर राष्ट्रवादीच्या ठिकाणी काँग्रेस दावेदारी करीत आहे. असा प्रकार राजकीय पक्षात सर्वत्र असल्याने या प्रकारामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांचा लोंढा मोठया प्रमाणात दिसून येत आहे.जिल्हय़ातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्यावतीने ४२ इच्छुक उमेदवार आहेत. तसेच राष्ट्रवदी काँग्रेसच्यावतीने तिन्ही विधानसभा मतदारसंघात १२, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने १२, भाजपाच्यावतीने निवडणूक लढण्यासाठी मोठी गर्दी दिसत असून, प्रबळ इच्छुक दावेदार म्हणून १३ जणांचा समावेश आहे. तर शिवसेनेकडे कारंजा विधानसभा मतदारसंघ असून, त्या ठिकाणी १५ जण इच्छुक आहेत. वाशिम व रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेतर्फे इच्छुकांचे नाव पुढे आले नसल्याची माहिती आहे. सर्वाधिक २९ इच्छुक उमेदवार वाशिम मतदारसंघातील असून, यापैकी अनेकांचे मुंबई येथे मुलाखतीसुद्धा झाल्या आहेत. वाशिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे ३२, कारंजात ८, रिसोडात २ उमेदवार इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वाशिम विधानसभा मतदारसंघात ५, कारंजा विधानसभा मतदारसंघात ५ तर रिसोड विधानसभा मतदारसंघात २ इच्छुक उमेदवारांचा समावेश आहे. भाजपाच्यावतीने वाशिम विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची गर्दी असून, प्रबळ दावेदार म्हणून ७ इच्छुक उमेदवारांचे नावे जोरात चालू आहेत. कारंजा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने येथे भाजपाच्यावतीने इच्छुकांची गर्दी दिसून येत नसली तरी शिवसेनेच्यावतीने मात्र १५ इच्छुक उमेदवार असल्याचे दिसून येत आहेत. यामध्ये काही शिवसेनेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्यासह परजिल्हय़ातील काही इच्छुक उमेदवारांचे नाव चर्चिल्या जात आहे. याच मतदारसंघात काँग्रेसच ८, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ तर मनसेच्यावतीने ६ जण इच्छुक आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी इच्छुक उमेदवारांनी आपल्यालाच उमेदवारी मिळणार या आविर्भावात कामास सुरुवात केली असून, मतदारांच्या भेटीगाठी घेणे सुरू केल्या आहेत. अद्याप कोणतीच तडजोड न झाल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, कोणाला तिकीट मिळू शकते याचा अंदाज बांधणे सुरू झाले आहे.