शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रिक्त पदांमुळे हतबल

By admin | Updated: May 12, 2014 23:22 IST

दैनंदिन कामांवर परिणाम होत आहे.

वाशिम : जिल्हय़ात ग्रामीण विकासाच्या दृष्टीने जिल्हा ग्रामीण विवकास यंत्रणा अतिशय मोलाची भूमिका बजावत असते.शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियान, हरियाली योजना, विविध प्रकारच्या घरकुल योजनांसह इतरही अनेक योजनांची अंमलबजावणी जिल्हा ग्रामीण विकास करीत असते. परंतु, वाशिम जिल्हय़ातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयात मंजूर असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या ४१ पदांपैकी तब्बल १९ पदे रिक्त असल्याने त्याचा दैनंदिन कामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हतबल झाली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ही स्वतंत्र यंत्रणा आहे. पूर्वी ही यंत्रणा जिल्हा परिषदेशी व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांशी संबंधित नव्हती. काही वर्षापूर्वी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला जिल्हा परिषदेशी विशेषत: मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांशी जोडण्यात आले. या यंत्रणेमार्फत अवर्षणप्रवण पाणलोट क्षेत्रविकास योजना, हरियाली योजना, सौर उर्जा विकास योजना, सुवर्णजयंती ग्राम स्वंरोजगार योजना आदी योजना पुर्वीच्या काळात राबविण्यात येत होत्या. आता त्यातील काही बंद करण्यात आल्या आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत सध्या इंदिरा आवास योजना, राजीव गांधी निवास योजना भाग क्रं. १ व भाग क्रं. २, रमाई घरकुल योजना, अल्पसंख्याक घरकुल योजना, मच्छिमार घरकुल योजना,पारध्यांसाठी विशेष पॅकेज अंतर्गत घरकुल योजना, राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियान आदी योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वाशिम कार्यालयासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांच्या ४१ पदांचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. त्यात प्रकल्प संचालक (१), स्वयंरोजगार शाखेत सहाय्यक प्रकल्प अधिकारी (पशुसंवर्धन) (१), सहाय्यक प्रकल्प अधिकारी (उद्योग) (१), टंकलेखक (२), महिला शाखेत सहाय्यक प्रकल्प अधिकारी (महिला) (१), तांत्रिक सहाय्यक (१), टंकलेखक (१),रोजगार शाखेत सहाय्यक प्रकल्प अधिकारी (रोजगार) (१), तांत्रिक सहाय्यक (१), लिपीक टंकलेखक (१), पाणलोट शाखेत सहाय्यक प्रकल्प अधिकारी (कृषी), तांत्रिक सहाय्यक (१), लिपीक टंकलेखक (१), अभियांत्रिकी शाखेत उपअभियंता (१), कनिष्ठ अभियंता (२), तांत्रिक सहाय्यक (१), वित्त शाखेत वरिष्ठ लेखाधिकारी (१), लेखाधिकारी (२), सहाय्यक, लेखाधिकारी (२) वरिष्ठ लेखा लिपीक (२), लिपीक टंकलेखक (१), संनियंत्रण शाखेमध्ये सहाय्यक प्रकल्प अधिकारी (सनियंत्रण( (१), अन्वेषक (१), लिपीक टंकलेखक (१), सामान्य प्रशासन शाखेत अधीक्षक (१), वरिष्ठ लिपीक (२), लघुलेखक (निम्न श्रेणी) (१), कॉम्प्युटर प्रोगामर (१), वाहनचालक (३) परिचर) रखवालदार (४) या पदांचा समावेश आहे. यापैकी प्रकल्प संचालक, स्वयंरोजगार शाखेतील दोन लिपीक टंकलेखक, महिला शाखेतील एक लिपीक टंकलेखक, रोजगार शाखेतील एक लिपीक टंकलेखक, पाणलोट शाखेतील एक सहाय्यक प्रकल्प अधिकारी (कृषी), एक लिपीक टंकलेखक अभियांत्रिकी शाखेतील एक तांत्रिक सहाय्यक, वित्त शाखेतील दोन लेखाधिकारी, एक सहाय्यक लेखाधिकारी, एक लिपीक टंकलेखक, संनियंत्रण शाखेतील एक लिपीक, एक लघुटंकलेखक, सामान्य प्रशासन शाखेतील दोन वरिष्ठ लिपीक,एक लघुलेखक (निम्नश्रेणी), दोन वाहनचालक चार परिचर, रखवालदार अशी एकूण २२ पदे भरलेली आहेत. मात्र, तब्बल १९ अधिकारी व कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहेत. त्यांचा कार्यालयाच्या दैनंदिन कामकाजावर व विविद शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवर परिणाम होत आहे.लोकांच्या कामांना विलंब लागत आहे.