शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

शेती शाळा समन्वयक, शेती शाळा प्रशिक्षकांचे जिल्हास्तर उजळणी प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:28 IST

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषी अधिकारी डी. के. चौधरी, तर उद्घाटक म्हणून प्रकल्प विशेषज्ञ (कृषी) मिलिंद अरगडे उपस्थित होते. मंचावर ...

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषी अधिकारी डी. के. चौधरी, तर उद्घाटक म्हणून प्रकल्प विशेषज्ञ (कृषी) मिलिंद अरगडे उपस्थित होते. मंचावर विदाताचे नोडल अधिकारी एस. के. देशमुख कृषी महाविद्यालय, रिसोडचे प्रा. एस. बी. खोडके, शेती शाळा समन्वयक आर. एस. घुले व प्रकल्प विशेषज्ज्ञ (मनुष्य बळ विकास) विश्वजित पाथरकर, आर. ए. खिल्लारी (प्रकल्प सहायक उपविभाग) प्रामुख्याने उपस्थित होते. एस. के. देशमुख यांनी प्रशिक्षणाचे उद्देश व पीक परिस्थितीनुसार आवश्यक तंत्राबाबत उपलब्ध तज्ज्ञ मंडळींची माहिती दिली. डी. के. चौधरी यांनी शेतीशाळेच्या माध्यमातून शिफारसीत कीटकनाशके वापर व हाताळणी तसेच हवामानाचा अचूक अंदाज पोहोचविण्याचे आवाहन केले. मिलिंद आरगडे यांनी शेतीशाळा समन्वयक, प्रशिक्षकांच्या भूमिका व जबाबदाऱ्यांविषयी सादरीकरण केले. एकात्मिक कीड व्यवस्थापन, सुधारित वाणांच्या वापराबाबत कृषी विज्ञान केंद्रातील आर. ए. आंबेनगरे, तर सुक्ष्म अन्नद्रव्याचा वापर व बीज प्रक्रिया याविषयी कृषी महाविद्यालय येथील प्रा. एस. बी. खोडके यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. एस. आर. टी. तंत्रज्ञानाबाबत सादरीकरण करून शेती शाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पीक उत्पादनाचे कमी खर्चाचे लागवड तंत्र बांधावर पोहोचवावे, असे आवाहन केले.

-----------

ऑनलाईन अ‍ॅप वापराबाबत मार्गदर्शन

विश्वजित पाथरकर यांनी शेतीशाळा अ‍ॅपबाबत उपस्थित प्रशिक्षणार्थींना माहिती देऊन अ‍ॅपचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले. शेतीशाळा समन्वयक आर. एस. घुले यांनी शेतीशाळेत सर्वेक्षण व निरीक्षणाचे महत्त्व व नोंदीबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. तांत्रिक सत्रानंतर तज्ज्ञ मार्गदर्शकांनी प्रशिक्षणार्थींच्या शंकांचे निरसन केले. प्रशिक्षणानंतर वनोजा फार्म येथील एसआरटी प्लॉटची पाहणी करण्यात आली. प्रशिक्षणास जिल्ह्यातील शेतीशाळा प्रशिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वजित पाथरकर, तर आभार अभिषेक देशमुख यांनी मानले.