यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गणेश चिमणकर, एम्पॉवर प्रगती व्होकेशनल स्टाफिंग प्रा. लि.चे अनिल ठोंबरे, स्वाती पाटील, अनिल भापुडकर, विशाल चंदन यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील १८ ते ३५ वयोगटातील युवक-युवतींना रोजगार, स्वयंरोजगाराची संधी प्राप्त व्हावी व त्यांचे जीवनमान उंचवावे, याकरिता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पूर्णत: निशुल्क असून, पुसद नाका येथील प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्रामध्ये १२० उमेदवारांना मोबाइल फोन-हार्डवेअर रिपेअर टेक्निशियन, फिल्ड टेक्निशियन, अदर होम अप्लायसेंस, काउंटर सेल्स एक्झिक्युटिव्ह या क्षेत्रात प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस. यांच्या हस्ते अनधा जैन, लक्ष्मी वानखेडे, अतुल भगत, गोविंद व्यवहारे, राहुल गवई, स्वप्नील दर्यापूरकर यांना प्रशिक्षण किट प्रदान करण्यात आली.
प्रशिक्षणार्थिंनाना प्रवेश किटचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:24 IST