शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी व नाफेड कर्मचाºयांमध्ये वाद; तूर खरेदी थांबली

By admin | Updated: May 14, 2017 19:29 IST

वाशिम: ओट्यावर मोकळी पडलेली तूर अवकाळी पावसामुळे ओली झाल्यानंतर, मोजण्यास नकार दिल्याने नाफेडचे कर्मचारी आणि शेतकऱ्यांत शनिवारी वाद झाला. त्यामुळे येथील खरेदी बंद पडली.

मालेगावातील प्रकरण: शेतकऱ्यांना सोमवारपर्यंत प्रतिक्षा करावी लागणारवाशिम: बाजार समितीच्या ओट्यावर मोकळी पडलेली तूर अवकाळी पावसामुळे ओली झाल्यानंतर मोजण्यास नकार दिल्याने नाफेडचे कर्मचारी आणि शेतकऱ्यांत शनिवारी वाद झाला. त्यामुळे येथील खरेदी बंद पडली. आता शेतकऱ्यांना सोमवारपर्यंत तूर मोजणीची प्रतिक्षा करावी लागणार आहे.शासनाने ३१ मेपर्यंत नाफेडच्या तूर खरेदीला मुदतवाढ दिली. त्यामुळे नाफेडच्या केंद्रावर आधीपासूनच प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलास मिळाला. तसेच नव्याने तूर विक्रीसाठी आणण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली. तथापि, हे सर्व कागदोपत्रीच असल्याचे दिसत होते. अखेर नाफेडच्या खरेदीला पुन्हा सुरुवात झाली. त्यातच शनिवारी मालेगावात तूर मोजणी सुरू असताना अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. अशातच एका शेतकऱ्याची तूर पाण्याने थोडी ओली झाली. तेवढ्यावरूनच सदर तूर मोजून घेण्यास नाफेडच्या कर्मचाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे आधीच वैतागलेल्या त्या शेतकऱ्यासह इतरही शेतकऱ्यांचा पारा चढला आणि नाफेडचे कर्मचारी आणि शेतकऱ्यांत शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे दुपारपासुनच येथील तूर मोजणी थांबली आणि रविवारीही या मोजणीला सुरुवात होऊ शकली नसल्याने शेतकऱ्यांना सोमवारपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. मालेगाव बाजार समितीत शेतकऱ्यांनी नाफेडवर विक्रीसाठी आणलेली तीन पोते तूर पावसात ओली झाली. ती मोजण्यावरून नाफेडचे कर्मचारी व शेतकऱ्यांत वाद झाल्याने तूर मोजणी बंद करावी लागली. सोमवारपासून पोलीस बंदोबस्तात तूर मोजणी केली जाईल.- प्रकाश कढणे, सचिव, बाजार समिती मालेगाव