रिसोड: फेब्रुवारी, मार्च महिन्यात झालेल्या गारीपटीमध्ये करडा गावातील शेतकर्यांचे नुकसान झाले. त्यामुळे करडा गावातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनस्तरावर या गावात कुठल्याही प्रकारचा सर्वे न झाल्यामुळे येथील शेतकरी वंचित राहिले आहे. खरिप पिकांची आणेवारी ५0 टक्के च्या आत असून शेतकर्यांना अद्याप कोणत्याच योजनेचा लाभ मिळाला नाही. नुकसान भरपाई देण्याची मागणी सरपंच धांडे व शेतकरी प्रमोद देशमुख यांनी निवेदनाव्दारे तहसीलदार कुंभार यांच्याकडे केली.
नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित
By admin | Updated: July 6, 2014 23:25 IST