---------------
धनज येथील वस्ती विकासापासून वंचित
धनज बु.: येथील रमाबाई आंबेडकर कॉलनी गेल्या कित्येक वर्षांपासून विकासापासून वंचित आहे. वस्ती परिसरात गटारे, झाडझुडपे, रस्त्यावरचे सांडपाणी आदिंची समस्या असून, याचा त्रास येथील रहिवाशांना सहन करावा लागत आहे. वारंवार निवेदन देऊनही दखल न घेतल्याने येथील ग्रामस्थांनी सोमवारी पुन्हा सरपंचांना याबाबत निवेदन दिले आहे.
----------
शिवसेना तालुकाप्रमुखपदी विलास सुरळकर
पोहा : येथील विलास सुरळकर यांची शिवसेना कारंजा तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार भावना गवळी, तसेच संपर्क प्रमुख अरविंद नेरकर यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. कारंजा येथे सोमवारी पार पडलेल्या कार्यक्रमात विलास सुरळकर यांना कारंजा तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र देण्यात आले. यावेळी शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.