धनज बु. येथे यंदा १५ फेब्रुवारीला पहिला कोरोना बाधित आढळून आला होता. त्यानंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढतच गेली. परिसरातील एकट्या धनज गावात आजवर ७० हुन अधिक व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून व्यापक उपाय योजना करण्यात आल्या, तर गावात कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी धनज बु. ग्रामपंचायतने संपूर्ण गावात जंतूंनाशकाची फवारणी सुरु केली आहे. त्याशिवाय ग्रामपंचायत, तहसील कार्यलायमार्फत गावातील व्यवसायिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्याला गावातील सर्व व्यावसायिकांनी चांगल्या प्रकारे सहकार्यही केले.
दरम्यान्, सोमवारी ग्रामपंचायतकडून संपूर्ण गावात ट्रॅक्टरच्या आधारे जंतूनाशकाची फवारणी करण्यात आली., तसेच गावातील नाल्यांचीही सफाई करण्यात आली. या वेळी ग्रामपंचायत सरपंच परवीन जिकर मोटलानी, ग्रामसेवक श्याम वेलूकर, वैद्यकीय अधिकारी सागर म्हस्के, उपस्थित होते.