शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक कामकाज प्रभावित न करता आंदोलन करण्याचा निर्धार

By admin | Updated: November 8, 2016 02:05 IST

तलाठी, ग्रामसेवकांचा सहभाग; प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याची मागणी.

वाशिम, दि. ७- प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता तलाठी, मंडळ अधिकारी आणि ग्रामसेवकांनी चार टप्प्यात सोमवार, ७ नोव्हेंबरपासून असहकार आंदोलनास सुरूवात केली आहे. यामुळे मात्र नगर परिषद निवडणूक कामकाजावर परिणाम होणार असून निवडणूक प्रशिक्षण वर्गालाही अल्प प्रतिसाद मिळाला.येत्या २७ नोव्हेंबरला जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर आणि कारंजा या तीन नगर परिषदांची निवडणूक होऊ घातली आहे. त्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यरत तलाठी आणि ग्रामसेवकांवर निवडणूक कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, यादरम्यान ग्रामसेवक, तलाठी आणि मंडळ अधिकार्‍यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे निवडणूकीच्या कामकाजावर बहुतांशी परिणाम जाणवण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. ग्रामसेवकांचे आंदोलन चार टप्प्यात होणार असून दुसर्‍या टप्प्यात ११ नोव्हेंबरला जिल्हा परिषदेसमोर एकदिवसीय धरे आंदोलन केले जाणार आहे. १५ नोव्हेंबरला आयुक्त कार्यालयासमोर; तर १७ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलनाची भूमिका घेण्याचा निर्णय ग्रामसेवक संघटनेने घेतला आहे. आंदोलनाचे चारही टप्पे नगर परिषद निवडणूकीदरम्यानच येत असल्याने ग्रामसेवक निवडणुकीत कितपत सहकार्य करतील, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासह तलाठी आणि मंडळ अधिकार्‍यांनीही आज एकदिवसीय धरणे आंदोलन करून आपल्या विविध प्रलंबित मागण्या सोडविण्याची गळ प्रशासनाला घातली. त्यांच्याही या भूमिकेमुळे निवडणुकीचे कामकाज बहुतांशी प्रभावित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.