शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

डीएड, बीएडच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना देता येणार टीईटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:28 IST

वाशिम : डीएड, बीएडच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनादेखील शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ...

वाशिम : डीएड, बीएडच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनादेखील शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, केवळ टीईटीच नको, शिक्षक नोकरभरतीही सुरू करा, असाही सूर विद्यार्थ्यांमधून उमटत आहे.

कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून शिक्षण क्षेत्राला जबर फटका बसला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून शिक्षक पात्रता परीक्षा होऊ शकली नाही. दोन वर्षांनंतर आॅक्टोबर महिन्यात महाटीईटी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदमार्फत टीईटी-२०२१ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यावर्षी फॉर्म ऑनलाईन भरण्याच्या प्रक्रियेमध्ये डीएड आणि बीएड अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना या परीक्षेची संधी देण्यात सुरुवातीला देण्यात आली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर शासनाने अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना टीईटी देण्याची संधी देण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

००००००००००००

५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार

डीएड आणि बीएडच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी म्हणून ३ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर अशी दीर्घ मुदत देण्यात आलेली आहे. कोरोनामुळे डीएड आणि बीएड विद्यार्थ्यांची अंतिम वर्षाची परीक्षा वेळेवर घेण्यात आलेली नाही आणि त्याचा निकालही लागला नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना महाटीईटी देता येणार नाही आणि त्यानंतर होणारी अभियोग्यता चाचणीदेखील देता येणार नाही, असे सांगत विविध संघटनांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. त्यानुसार ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली.

०००००००००००

विद्यार्थी म्हणतात..

शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना संधी मिळाल्याने दिलासा मिळाला आहे. टीईटीप्रमाणेच शिक्षक नोकरभरतीदेखील सुरू करणे अपेक्षित आहे. अंतिम वर्षात असताना टीईटी देता आली तर ही परीक्षा लवकर उत्तीर्ण होऊन नोकरीच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना प्रयत्न करणे अधिक सुलभ होईल.

- मिलिंद सरकटे, विद्यार्थी.

००००००

शिक्षक पात्रता परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास ५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने वाशिमसह राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. शिक्षण सुरू असतानाच परीक्षा देण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

- शीतल वानखेडे, विद्यार्थिनी

००००००००००००००

डीएडच्या अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी - १२६

बीएडच्या अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी - ११०