शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

मूलभूत सुविधांचा उडाला बोजवारा

By admin | Updated: July 19, 2014 01:06 IST

कर्मचार्‍यांच्या संपाचा परिणाम : कारंजावासीयांचे आरोग्य धोक्यात.

कारंजालाड : येथील नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलनाचे हत्यार उगारल्याने नागरिकांना मिळणार्‍या मुलभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. स्थानिक रहिवाशांना मुलभूत सुविधा देण्यासाठी नगरपालिका प्रशासन कटिबद्ध असते. मात्र मागील तीन दिवसापासून ज्यांच्यावर शहर स्वच्छता अथवा इतर मुलभूत सुविधा देण्याची जबाबदारी आहे तेच अधिकारी तथा कर्मचारी संपावर गेल्याने शहर स्वच्छतेचे गणित विस्कटले आहे. मागील तीन ते चार दिवसापासून दररोज पाऊस बरसत असल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. उघड्या नालीत रस्त्यावरील कचरा वाहून जात असल्याने नाल्या तुंबून परत तो घाण कचरा रस्त्यावर येत आहे. त्यामुळे शहराच्या सखल भागात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगर परिषदेचे कर्मचारी संपावर गेल्याने काही ठिकाणी कचर्‍याचे ढिगारे तसेच पडून आहेत. नाल्यांची स्वच्छता थांबली आहे. तत्कालिन नगराध्यक्ष संजय काकडे यांनी माळीपुरा परिसरातील धाप्याचे खोदकाम केले. मात्र काम पूर्ण झाले नसल्याने नागरिकांना ये-जा करण्याकरिता त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अंतर्गत रस्त्यावर खड्डे पडले आहे, हे खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.