शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीसाठी महिलांची पक्षनेतृत्वाकडे मागणी

By admin | Updated: September 6, 2014 00:02 IST

वाशिम जिल्ह्यातील तीनही मतदार संघात ७ महिला इच्छूक.

वाशिम : जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघासाठी महिला इच्छूक आहेत परंतु त्यांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने वाशिम व रिसोड विधानसभा मतदार संघातून इच्छूक असलेल्या महिलांनी माघार घेतली. त्यांनी प्रयत्न केले मात्र निष्फळ ठरले. कारंजा विधानसभा म तदार संघातील दोन राजकीय पक्षाच्या इच्छूक महिला उमेदवारांनी मात्र थेट मुख्यमंत्री यांची भेट घेतली तर येथे आलेल्या पक्षनिरिक्षकांनाही निवेदन देवून महिला उमेदवार उभे करण्याची मागणी केली आहे.सुरूवातील विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले तेव्हा तीनही विधानसभा मतदार संघात ७ महिला निवडणूक लढविण्यास इच्छूक होत्या. यामध्ये वाशिम विधानसभा मतदार संघातून ४, कारंजा विधानसभा मतदार संघातून २ तर रिसोड विधानसभा मतदार संघातून २ यांचा समावेश होता. मात्र यानं तर पक्षाच्यावतिने व पदाधिकार्‍यांनी पुढाकार न घेतल्याने इच्छूक महिलांची मागणी मागे पडली. काही दिवसाआधी एका वाशिम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा काँग्रेसच्या नेत्या यांनी थेट मुख्यमंत्री यांची भेट घेवून याबाबत चर्चा केली तसेच पक्ष निरिक्षकांना भेटूनही आपले मत व्यक्त केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्याही एका महिला नेत्या व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा यांनी सुध्दा पक्षङ्म्रेष्ठीकडे कारंजा विधानसभा मतदार संघात महिला उमेदवार देण्याची मागणी केली होती मात्र त्यांनी यानंतर पुढे कोणतेच पाऊल उचलले नसल्याने त्यांची मागणी केवळ मागणीच राहिली. उमेदवारी मिळो अथवा न मिळो मात्र कारंजा विधानसभा मतदार संघात महिलांनी उमेदवारीसाठी फिल्डींग लावल्याने अनेक इच्छूक पुरूष उमेदवारांमध्ये खळबळ माजली आहे. तसेच प्रत्येक जिल्हयात किमान एका तरी महिलेला विधासभेचे तिकीट द्यावे असा आग्रह कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील काही महिलांनी मागणी केली आहे.जिल्हयात ८ लाख ४९ हजार जवळपास मतदार आहे त्यात महिला ४ लाख मतदार असताना गेल्या ५0 वर्षात केवळ बोटावर मोजण्याइतपत महिलांनाच विधानसभेवर जाण्याची संधी मिळाली. महिलांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिल्यास त्याही विधानसभेत जाऊ असे बोलल्या जाते.