.................
नरेंद्र पवार यांचे कारंजात स्वागत
कारंजा : भाजपचे ठाणे येथील माजी आमदार तथा राज्य भटक्या जमाती आघाडीचे संयोजक नरेंद्र पवार यांचे २२ जानेवारी रोजी कारंजा येथे स्वागत करण्यात आले. यावेळी कैकाडी महासंघ विदर्भ सचिव पांडुरंग माने, जिल्हाध्यक्ष अनिल जाधव, भटक्या विमुक्त जाती जमाती संघाचे सचिव संजय कडोळे आदी उपस्थित होते.
................
मराठा समाज सेवा मंडळाची बैठक
वाशिम : स्थानिक लाखाळा परिसरातील बळीराम पाटील इढोळे यांच्या निवासस्थानी मराठा समाज सेवा मंडळाची बैठक शनिवारी पार पडली. विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
................
खचलेल्या विहिरीची भरपाई देण्याची मागणी
वाशिम : रिसोड तालुक्यातील अंचळ येथे शेतातील विहीर खचल्याचा पंचनामा दिल्यानंतरही दिव्यांग शेतकरी बाबूराव वानखेडे यांना नुकसानभरपाई मिळाली नाही, ती देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी २२ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
..................
गोरसाहित्य दलाच्या अध्यक्षपदी प्रा. रतन राठोड
वाशिम : गोरसाहित्य दलाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी वाशिम येथील साहित्यिक प्रा. रतनकुमार राठोड यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. गोरसाहित्य उजेडात यावे, या हेतूने गोरसिकवाडीचे प्रमुख काशीनाथ नायक यांनी याबाबत घोषणा केली.
................