शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पिंजर-कारंजा रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी स्लग: संतप्त ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

By admin | Updated: May 6, 2014 19:16 IST

पिंजर: मूर्तिजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील पिंजर-कारंजा रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांसह प्रवाशांनाही या खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले, तसेच अनेक प्रवासीही पाठदुखीने त्रस्त झाले आहेत. संबंधित अधिकार्‍यांनी याची दखल घेऊन त्वरित रस्ता दुरुस्ती न झाल्यास आंदोलन छेडण्याची तयारी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

पिंजर: मूर्तिजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील पिंजर-कारंजा रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांसह प्रवाशांनाही या खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले, तसेच अनेक प्रवासीही पाठदुखीने त्रस्त झाले आहेत. संबंधित अधिकार्‍यांनी याची दखल घेऊन त्वरित रस्ता दुरुस्ती न झाल्यास आंदोलन छेडण्याची तयारी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. पिंजर-कारंजा रस्ता हा पिंजरसह परिसरातील लोकांसाठी महत्त्वाचा असून, या रस्त्यावर पिंजर परिसरातील अनेक खेडी आहेत. या रस्त्यावरून परिवहन महामंडळाच्या गाड्यांसह खासगी वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते आणि दररोज शंभरच्यावर विद्यार्थी तसेच शेकडो प्रवासी विविध वाहनांतून प्रवास करीत असतात. या रस्त्याची अवस्था खूपच वाईट झाली असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी, तर रस्ताच दुभागल्यासारखी स्थिती दिसून येते. यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना असहनीय असा त्रास होत आहे. खड्ड्यांमुळे धक्के बसून दुचाकीसह बसगाड्यांसारखी वाहने खिळखिळी झालीच शिवाय कित्येक प्रवाशांनाही पाठदुखीचा त्रास सुरू झाला आहे. असे असतानाही मूर्तिजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरुस्ती करण्याची तसदी घेतली नाही. वाहनधारक आणि प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली असून, ती पूर्ण झाली नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)