शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी निर्णयाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत दिरंगाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:57 IST

पात्र शेतकरी संभ्रमात : बँका गुंतल्या याद्या तयार करण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: अस्मानी, सुलतानी संकटांमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी मिळण्याकरिता थेट राज्य शासनाच्या विरोधात आंदोलन छेडले. त्याचा सकारात्मक फायदा झाला आणि मुख्यमंत्र्यांनी दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर केली; मात्र या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याने शेतकरी संभ्रमात सापडले आहेत. दुसरीकडे पीक कर्ज वाटप करणाऱ्या सर्वच बँका गेल्या अनेक दिवसांपासून केवळ याद्या तयार करण्यातच गुंतल्याने कर्जमाफी कधी मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी २०१२ नंतरच्या थकीत असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली. त्यानुसार, बँकांकडून याद्या मागविण्यात आल्या; मात्र त्यावर शेतकरी संघटना तथा विरोधकांनी आवाज उठविल्यानंतर तीन वर्षे मागे जात २००९ पासून पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल, असे जाहीर करण्यात आले. त्यामुळे पुन्हा बँकांकडून सुधारित याद्या मागविण्यात येत आहेत. तथापि, दैनंदिन बँकिंग व्यवहार सांभाळून कर्जमाफीस पात्र ठरू शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या गोळा करण्यातच बँकांचा अधिक वेळ जात असून, कर्जमाफी मिळण्यास विलंब होत असल्याने नव्याने कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांचीही गोची झाली आहे. कर्जमाफीच्या या गदारोळात १६ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा वेगळे वक्तव्य करून ज्यांचे उत्पन्न १० लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांना कर्जमाफी मिळणार नाही, असे जाहीर करून ज्यांची उपजीविका निव्वळ शेतीवरच अवलंबून आहे, त्यांनाच कर्जमाफी मिळेल, असा फतवा जाहीर केल्याने कर्जमाफीच्या निर्णयातील घोळ कमी होण्याऐवजी दिवसागणिक वाढतच चालल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.