शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

युती तुटल्याने कारंजात सेनेचे नुकसान

By admin | Updated: October 20, 2014 01:06 IST

काँग्रेसची एक जागा कायम

वाशिम : विधानसभा निवडणुकीत आघाडी व युती तुटली. कारंजा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेला त्याचा फटका बसल्याचे दिसून येते. काही ठिकाणी प्रबळ उमेदवार न मिळाल्याने त्याचाही फटका जाणवल्याचे चित्र निवडणूक निकालावरून दिसून येते. युती व आघाडी असताना वाशिम विधानसभा मतदारसंघ काँग्रेस व भाजपाकडे होता. रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये युती व आघाडी असताना काँग्रेस व भाजप उमेदवार देत होते. कारंजा विधानसभा मतदारसंघामध्ये युती व आघाडी असताना राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना लढतीत होते. युतीची व आघाडीची फारकती झाल्याने प्रत्येकाने आपआपले उमेदवार यावेळी उभे केले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर युती व आघाडी तुटल्याने प्रत्येक पक्षासमोर प्रबळ उमेदवार नसल्याने अनेक ठिकाणी कोणताही उमेदवार उभा करण्यात आला. जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांतील मतदारांनी भाजपला सर्वाधिक मतदान केल्याचे दिसून येते. तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवारांना १ लाख ४७ हजार १७८ मतदारांनी मतदान केले. शिवसेनेच्या उमेदवारांना ६८५0५ मतदारांनी मतदान केले. काँग्रेस उमेदवारांना १ लाख ९ हजार ९१७, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना ४८ हजार ५६७ मतदारांनी मतदान केल्याचे निवडणुकीच्या निकालावरून दिसून येते. सेना व भाजपा युती असती, तर युतीमध्ये कारंजाकडे असलेली जागा शिवसेनेच्या ताब्यात असती. कारंजा येथे शिवसेना व भाजपाच्या उमेदवारांना पडलेल्या मताची बेरीज केली, तर ५१ हजार २८ मते युतीच्या उमेदवारास पडली असती. युतीचा उमेदवार ठरल्याप्रमाणे शिवसेनेचा असता. युती तुटल्यामुळे शिवसेना व भाजपने स्वतंत्र उमेदवार उभा केला. या घडामोडीमुळे शिवसेनेचे एका जागेचे नुकसान झाले. युती असती, तर रिसोडमध्ये युतीच्या उमेदवारास ७२६५६ आणि आघाडी असती तर ७६७५0 मतदान झाले असते, हे या निवडणुकीत झालेल्या आकडेवारीवरून दिसून येते. झालेही तसेच. येथे काँग्रेसची जागा निवडून आल्याने येथे आघाडी तुटल्याचा काही परिणाम झाला नाही. वाशिममध्ये भाजप, शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांचा विचार केला, तर येथेही युतीचाच विजय निश्‍चित दिसून येतो व झालेही तसेच. कारंजा येथे मतदारांनी केलेल्या मतदानाचा विचार करता येथे युतीचीच जागा निवडून येणार, असे मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून येते. परंतु, ही जागा युती असती तर शिवसेनेच्या वाटेला असती व इथे शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय असता. पण, फारकतीमुळे येथे सेनेचे नुकसान दिसून येत आहे. युती व आघाडी नसली तरी मतदारांना मात्र आपले मत नोंदवताना कसलीही अडचण भासली नाही.