शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

वाशिमच्या गौरवशाली नाट्यचळवळीला उतरती कळा

By admin | Updated: November 30, 2014 23:54 IST

रंगभूमी दिन विशेष : आचार्य अत्रेंनी आत्मचरित्रात केला होता वाशिमच्या नाट्यचळवळीचा गौरव.

धनंजय कपाले /वाशिमएकेकाळी वैभवशाली असलेली येथील नाट्यचळवळ आजघडीला टीव्हीचा वाढता प्रसार, रसिकांची बदललेली अभिरुची, लोप पावलेला रसिकाश्रय व औषधालाही शिल्लक नसलेला राजाश्रय यातून या नाट्यपरंपरेची पडझड झाली असलीतरी एका काळी वाशिमच्या रंगकर्मीनी राज्याची रंगभूमी गाजविली असल्याचा गौरवशाली इतिहास वाशिमच्या रंगकर्र्मींनी घडविला आहे.येथील नाट्य कलावंत मंडळांनी सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणार्‍या पुणे मुंबईच्या नाट्यगृहात प्रयोग लावण्याचे धाडस केले होते. विशेष म्हणजे तेथील सृजनशील रसिकांनी हे प्रयोग डोक्यावर घेत वाशिमकर कलावंतांच्या यशाची पावती दिली. वाशिमचा शो आणि हाउसफुल्लची पाटी हे समीकरण दृढ झाले होते. याची दखल आचार्य अत्रे यांनी यांच्या मी कसा घडलो या आत्मचरित्रात घेतली होती. मात्र, आजमितीला पुरातनकाळी जागतिक कीर्तीच्या राजशेखरसारख्या नाटककाराचे व १८ शतकात महाराष्ट्राची व्यावसायिक रंगभूमी गाजविणार्‍या करुणेश्‍वर प्रासादिक संगीत मंडळीच्या नाट्यवैभवाचा वारसा सांगणार्‍या तत्कालीन वत्सगुल्म व आताच्या वाशिमतील नाट्यचळवळ लोकाश्रय व राजाश्रयाअभावी थंडावली आहे.१९६५ ते ८५ च्या कालखंडात सुरुचित साधना या नाट्यसंस्थेने नावलौकिक मिळविला. हे मंडळ डॉ. ह.त्र्यं. खरे यांनी स्थापन केले होते. सुधाताई राजे अँड. भाउसाहेब काळू, श्रीपाद माझोडकर, ध.ह. खरे, बी.वाय. पाटक ,डी.ए. कुळकर्णी यासारखे कलावंत तर अण्णासाहेब मुळे व अण्णासाहेब आमडेकरासारखे दिग्दर्शक या संस्थेने कलावतरुळात दिले. विदर्भ साहित्य संमेलनात या मंडळाने सादर केलेले प्रेमा तुझा रंग कसा हे नाटक विशेष गाजले.१९८0 च्या दरम्यान येथील नाट्यचळवळीत डॉ. रवि जाधव, धनंजय खरे, दिलीप देशमुख, बाबुजी (एकनाथ) कदम, छाया काळे, मंगल इंगोले, साहेबराव खोब्रागडे, रोहिणी खरे, विकास देशपांडे, नाना काळे, एस.एम. आहाळे आदींनी राजशेखर नाट्य मंडळाची स्थापना केली. या मंडळाने सादर केलेले माझी घरटी माझी पिल्ल, भोवरा, खामोश, अदालत जारी है. वल्लभपुरची दंतकथा, डाग, घोटभर पाणी या एकांकिका गाजल्या. यातील एस.एम.आहाळे सद्या आघाडीचे चित्रपट कथाकार आहेत. त्यांनी हम आपके है कौन, मैने प्यार किया यासह राजश्री प्रॉडक्शनच्या इतर चित्रपटांसाठी लेखन केलेले आहे.