शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एकाचा मृत्यू; ४६७ कोरोना पॉझिटिव्ह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:42 IST

मंगळवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे मंगरुळपीर तालुक्यात आढळून आले आहेत. वाढीव कोरोना चाचण्यांच्या तुलनेत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ...

मंगळवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे मंगरुळपीर तालुक्यात आढळून आले आहेत. वाढीव कोरोना चाचण्यांच्या तुलनेत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या स्थिर असली तरी कोरोनाचा आलेख खाली येत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात आणखी एका जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद मंगळवारी घेण्यात आली. एकूण ४६७ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम ७२, मालेगाव तालुक्यातील ६८, रिसोड तालुक्यातील ५७, मंगरूळपीर तालुक्यातील १०७, कारंजा तालुक्यातील ८४ आणि मानोरा तालुक्यात ३० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील २९ बाधिताची नोंद झाली असून ६८० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

०००००००००००

वाशिम तालुक्यातील रुग्णसंख्येत घट

मंगळवारी प्राप्त अहवालानुसार गत आठ दिवसात पहिल्यांदाच वाशिम तालुक्यातील रुग्णसंख्येत घट आल्याचे दिसून आले. वाशिम तालुक्यात ७२ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे मंगळवारच्या अहवालानुसार समोर आले. त्या तुलनेत मंगरुळपीर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या जवळजवळ दुपटीने वाढली आहे. वाशिम शहरासह तालुक्यातील रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी नागरिकांनी कोरोनाविषयक नियमाचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

००००

६८० जणांची कोरोनावर मात

मंगळवारच्या अहवालानुसार नव्याने ४६८ रुग्ण आढळून आले तर तब्बल ६८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, ही बाब जिल्हावासीयांसाठी दिलासादायक ठरणारी आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल व खासगी कोविड हॉस्पिटल येथे जवळपास ९५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर उर्वरीत जवळपास ३४०० रुग्ण हे गृहविलगीकरणात आहेत.

००००